काही मिनिटांमध्येच बनणार PAN कार्ड ! इन्कम टॅक्स विभाग आणतंय नवीन सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभाग लवकरच काही वेळातच पॅनकार्ड बनवण्याची नवीन फॅसिलिटी आणणार आहे. यामध्ये आधारकार्डवरून अर्जदारांची माहिती घेतली जाणार असून याद्वारे व्हेरिफिकेशन सोपे जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही आठवड्यांतच हि फॅसिलिटी सुरु होणार असून तुमचे पॅनकार्ड हरवले असल्यास तुम्ही काही मिनिटांतच पॅनकार्ड बनवू शकता.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक पॅन हि सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी केवळ तुम्हाला आधार कार्ड व्हेरिफाय करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला एक ओटीपी क्रमांक येईल. त्यानंतर आधारावरील माहितीनुसार तुमची सर्व माहिती भरली जाणार असून तुम्हाला कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर तुम्हाला डिजिटल रूपातील एक पॅनकार्ड देण्यात येणार असून यामध्ये एक QR कोड असणार आहे.

दरम्यान, याआधी एका प्रयोगामध्ये एका आठवड्यात 62,000 हुन अधिक ePAN देण्यात आले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण देशभरात हे लागू करण्याची योजना आहे.

Visit : Policenama.com