लवकरच नाट्यगृहांमध्ये ‘जॅमर’ बसवणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. नाट्यगृहात प्रेक्षकांकडून होणाऱ्या मोबाईलच्या वापरानं कलावंत अनेक दिवसांपासून नाराज होते. यानंतर आता मुंबई महानगरपालिकेनं नाट्यगृहात जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा प्रेक्षकांचा मोबाईल प्रयोगादरम्यान अचानक वाजतो किंवा काही प्रेक्षक मध्येच मोबाईल वापरतात. याचा कलावंतांसह इतरही प्रेक्षकांना त्रास होताना दिसतो. अनेकवेळा मोबाईल सायलेंट करण्याबाबत प्रयोगापूर्वी सूचना देऊनही असे प्रकार निदर्शनास येतात. त्यामुळे प्रशासनानं जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे याच्या एका नाटकाच्या प्रयोगा दरम्यान एका प्रेक्षकाचा मोबाईल वाजल्यानं सुबोध भावेनं नाराजी व्यक्त केली होती. सोशलवर त्यानं यासंदर्भात पोस्टही शेअर केली होती. यानंतर पुढच्या त्याच्या नाटकाच्या प्रयोगावेळी त्यानं स्वत: एन्ट्रीला थांबून प्रेक्षकांचे मोबाईल सायलेंट मोडवर करून घेतले होते.

मुंबई महानगरपालिकेनं आता नाट्यगृहात जॅमर बसवल्यानंतर सुबोध भावेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. याबाबत त्यानं वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रियाही दिली. दरम्यान नाट्यगृहात जॅमर बसवल्यानंतर याचा नाटकांवर काही परिणाम होईल का असं प्रश्न विचारल्यानंतर सुबोध म्हणाला, “याचा नाटकावर काहीही परिणाम होणार नाही. कारण 95 टक्के लोक सिरीयसली नाटक पहायलाच आलेले असतात. 5 टक्केच लोक असे असतात जे खोडसाळ असतात ज्यांच्यामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासानानं घेतलेला निर्णय योग्य आहे.” असं तो म्हणाला.

दरम्यान सुमित राघवन यानंही या निर्णयाचं स्वागत केलं. त्यानंही याचा नाटकावर काही परिणाम होणार नाही असंही त्यानं सांगितलं आणि महापालिकेचा निर्णय स्तुत्य असल्याचं म्हटलं.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like