पु. ल. देशपांडे उद्यानात साकारणार कलाग्राम

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

पुणे महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीकडून  नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात ‘कलाग्राम ’चे काम करण्यासाठी निविदा प्रकिया राबविण्यात आली होती. मंगलमुर्ती डेव्हलपर्सच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली असून, यासाठी ५६ लाख ३५ हजार रुपयांचे काम ठेकेदाराकडून करून घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39f137ad-c0c5-11e8-9e5f-59ef0b4e1285′]
कलाग्राम विषयी

देशभरातील विविध राज्यांच्या लोककला तसेच ग्रामीण कलासंस्कृती पर्यटकांना एकाच छताखाली पाहता यावी, यासाठी सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. खासदार अनिल शिरोळे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून कलाग्रामचा खर्च करण्यात येणार आहे.

पानमळा येथील ३३ एकर जागेत महापालिकेने साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या नावाने उद्यान विकसित केले आहे. जपानी शैलीचे गार्डन, मोगल शैलीचे गार्डन आणि ग्रामीण कला मांडणारे कलाग्राम साकारण्याचे नियोजन तीन टप्प्यात करण्यात आले होते. यापैकी पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून तिसर्‍या टप्प्यात कलाग्रामची निर्मिती करण्यात येणार आहे.

बांबू व दगडापासून तयार होणार्‍या विविध वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, ऍम्ङ्गिथिएटर आदी सुविधांचा कलाग‘ाममध्ये समावेश करण्यात येणार आहे. विविध राज्यांतील लोककला व ग्रामीण कलासंस्कृतीची एकाच ठिकाणी माहिती मिळणार आहे. हौशी व नवोदीत कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पासाठी प्रशासनाने निविदा प्रकिया राबविली होती. यामध्ये तीन ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या होत्या . त्यापैकी मंगलमूर्ती डेव्हलपर्स यांची निविदा पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रकमेपेक्षा २४.८६ टक्के कमी दराने आली. ती सर्वात कमी होती. त्यामुळे या ठेकेदाराकडून ५६ लाख ३५ हजार रुपयांचे काम करून घेण्यास मान्यता देण्यात आली.

पुणे | गणेश मुर्तीची विटंबना करणारे अविनाश बागवे यांना जामीन मंजुर