सावधान ! वाहतूक नियमांचा दंड न भरल्यास आता विमा रक्‍कमेतून होणार ‘वसुली’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे, आणि हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. अनेकदा गाडीच्या किंमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागल्याच्या घटना आहे. त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत.

त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले असून या खिसेकापू दंडामुळे धास्तावले असून नागरिक या दंडापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगत आहे. मात्र काही नागरिक आपल्यावर असलेला दंड भरताना दिसून येत नाहीत. मात्र आता अशा लोकांसाठी सरकारने वेगळी योजना आणली असून तुम्ही दंडाची रक्कम जर भरली नसेल तर ती रक्कम तुमच्या विमा योजनेत जोडली जाणार आहे. त्यामुळे पुढील वेळेस तुम्ही विमा घेतल्यास तुम्हाला हि रक्कम त्यामध्ये भरावी लागणार आहे. त्यामुळे पोलिसांना हि रक्कम वसूल करणे सोपे जाणार आहे. यासाठी भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने यावर काम सुरु केले असून याची चाचणी म्हणून दिल्लीमध्ये ही योजना लागू केली आहे.

अपघातात होणार घट

सरकारने हा निर्णय घेतल्यास बेदरकारपणे वाहने चालवून अपघातास आमंत्रण देणाऱ्या व्यक्तींमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये घट होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या नवीन नियमांमध्ये जर सफलता मिळली तर संपूर्ण देशात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नऊ जणांची समिती

यासाठी नऊ जणांची समिती बनविण्यात आली असून यामध्ये विविध विभागातील प्रतिनिधींचा समावेश आहे. आठ आठवड्यांमध्ये हि समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

80 टक्के दंडामध्ये घाट

सरकारच्या या निर्णयामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले असून या खिसेकापू दंडामुळे धास्तावले असून नागरिक या दंडापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगत आहे. दरम्यान, दिल्ली वाहतूक पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,दिल्लीमध्ये दंडाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून नागरिक दंडाच्या भीतीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त