Coronavirus : TV आणि फ्रिजसह ‘या’ वस्तू होऊ शकतात महाग,’या’ देशामुळं किंमती वाढणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे भारतीयांच्या चिंतेत आणखी वाढ होणार आहे. कारण ही बातमी चीनी पुरवठादार कंज्यूमर ड्युरेबल्सशी संबंधित सामानाच्या किंमती वाढण्यासंबंधित आहे. जर या वस्तू महाग झाल्या तर भारतीय उत्पादकांना आपल्या किंमती वाढवणं भाग पडेल. कारण भारतातील उत्पादक 70 टक्के कच्चा माल चीनहून मागवतात.

टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन तयार करणं सर्वच महागणार –
फिक्कीने भारत सरकारला दिलेल्या एका प्रेजेंटेशन नुसार सांगण्यात आले की चिनी पुरवठादारांनी टेलिव्हिजन पॅनलच्या किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच इतर कंपोनेंटच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात ना की फक्त घरात उपयोगी असलेल्या वस्तुची किंमत वाढेल तर टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन तयार करणं महागेल. यामुळे लॉकडाऊनमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला विविध समस्यांचा सामना करावा लागेल.

9 – 10 लाख कोटी रुपयांच्या सहाय्यता निधीची आवश्यकता –
फिक्कीने सांगितले की अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता भारत सरकारने उद्योग जगताला जवळपास 9 – 10 लाख कोटी रुपयांचे स्टिमुलस पॅकेज द्यावे. ही शिफारस अशावेळी आली आहे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था लॉकडाऊनमधून बाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा आर्थिक कार्य सुरु करण्याच्या तयारीत आहे.

70 टक्के कच्चा माल चीनहून येतो –
सध्या भारतीय कंज्यूमर ड्युरेबल्स गुड्स उद्योगाचे पाहिले तर 70 टक्के कच्चा माल यांना चीनहून मिळतो. एवढेच नाही तर हे उत्पादक 45 टक्के सामान कंप्लिटली बिल्ड यूनिटच्या रुपात चीनहून मागवतात. अशावेळी हे निश्चित आहे की टेलिव्हिजन, एसी, म्यूझिक सिस्टम, वॉशिंग मशीन, फ्रिज इत्यादीच्या किंमती वाढू शकतात. हे देखील महत्वाचे आहे की किंमतीत अशावेळी वाढ होत आहे जेव्हा देशांतर्गत बाजारात या किंमती घटत आहे. यामुळे बाजारात हे दर किती वाढतात हे पाहावे लागेल.

यामुळे औषध देखील महागू शकतात –
सांगण्यात येत आहे की चीनने काही अ‍ॅक्टिव्ह फॉर्मा इंग्रेडिएंड – एपीआय – च्या किंमती देखील 40 – 50 टक्क्यापर्यंत फायदा होतो. एपीआयचा उपयोग औषध निर्मितीवर होत आहे, उल्लेखनीय आहे की भारतात काही कंपन्या अशा आहेत ज्या येथेच एपीआयची निर्मिती करतात. तर, बाकी कंपन्या दुसऱ्या देशातून विशेष करुन चीनहून एपीआय मागवतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like