आता ‘चहा’मध्ये ‘साखर’ नव्हे तर ‘मधा’चा घ्या ‘स्वाद’, ‘हा’ आहे सरकारचा ‘प्लॅन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच तुम्हाला चहा पिताना साखरेव्यतिरिक्त मधाचा आस्वाद घेता येणार आहे. टर्नओव्हर वाढवण्यासाठी सरकार ग्रामीण उद्योग अंतर्गत मधाच्या वापराला प्रोत्साहन देणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की, ग्रामीण उद्योगांना वाढवण्यासाठी ज्या व्यवसायाची निवड करण्यात आलेली आहे तो व्यवसाय मध निर्मितीचा व्यवसाय आहे. विमान आणि मोठ्या हॉटेल्समध्ये साखरेऐवजी मधाचा वापर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे देखील गडकरींनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारचे लक्ष खादी आणि ग्रामीण उद्योगावर आहे याचा एकूण टर्नओव्हर एक लाख कोटींपर्यंत वर्षाला वाढवला जावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. 2018 मध्ये भारताचा शहरांमधील एकूण व्यापार 1,557.9 कोटी रुपये इतका होता. 2024 पर्यंत हा व्यवसाय 2,805.7 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आयमार्क या कंपनीने केलेल्या संशोधनामध्ये ही बाबा समोर आली आहे.

ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचा आहे सरकारचा हेतू
यासाठी अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, लेह, लदाख आणि काश्मीरमधील 115 जिल्ह्यांना प्राधान्य दिलं जाईल, असं गडकरी म्हणाले. ग्रामीण उद्योगाची एकूण उलाढाल 75 हजार कोटी रुपये असून यंदा ती 1 लाख कोटी रुपये झालेली असेल. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराची मागणीही सरकार पूर्ण करू शकेल. या भागात सरकारला मध, मत्स्यपालन, जैवइंधन, बांबू आणि जंगलांचे उत्पादन वाढवायचे आहे.

या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींनी श्रीनगरमध्ये खादी ग्रामउद्योग प्रोजेक्ट लॉंच बाबत देखील माहिती दिली. येथील महिलांनी बनवलेल्या रुमालाची किंमत केवळ पन्नास रुपये असून इतर ब्रँडेड रुमालांपेक्षा हा खूप स्वस्त असल्याचे देखील नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like