‘मेडिकल’ इन्शुरन्सव्दारे मिळवु शकता ‘योगा’, ‘जीम’ आणि ‘प्रोटीन’ सप्लीमेंटचा खर्च, जाणून घ्या ‘प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेडिकल इन्शुरन्स लवकरच योग केंद्र आणि जिमच्या सदस्यतेचे शुल्क भरणे तसेच प्रोटीन सप्लिमेंट खरेदी करण्यासाठी व्हाऊचर मिळू शकतात. भारतीय विमा नियामक आणि विकास प्रधिकरण (IRDAI) सामान्य लोकांमध्ये आरोग्यासंबंधित जागरुकता वाढवण्यासाठी नवे दिशानिर्देश प्रस्ताविक करत आहे. इरडाने आरोग्यासंबंधित फीचर आणि फायद्यावर दिशानिर्देशात सांगितले की आरोग्य विमा देणारे किंवा त्यांच्या जोडलेल्या रुग्णालयात विमाधारकांना उपचार, औषधे, आरोग्याची तपासणी या संंबंधित विशिष्ट सेवा सादर करु शकतात.

– त्यात म्हणले आहे की, विमाशी संबंधित आरोग्य आणि तंदरुस्तीच्या अटींच्या आधारे विमाधारकांना आरोग्यासंबंधित जागरुक करण्यात येईल.

– इरडानुसार त्यातून विमाधारकांना उपचार, आरोग्य तपासणी, प्रोटीन सल्पिमेंट खरेदीसाठी व्हाऊचर तसेच योग आणि जिम इत्यादीसाठी सवलतीचे व्हाऊचर देण्यात येईल.

– मसुद्यात सांगण्यात आले की सुविधा देण्यासंबंधित विमा प्रदाता कंपनी उत्पादनाबरोबर वेगळे शुल्क द्यावे लागतील.

– विमा देण्याऱ्या कंपन्यांना विमा देताना हे स्पष्ट करावे लागेल या सुविधेसाठी ते किती शुल्क घेणार.

Visit : Policenama.com 

You might also like