खुशखबर ! लवकरच सरकारी नोकरदारांना जास्तीचा पगार, ‘या’ EPF नियमांमध्ये बदलाची तयारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सल्ला दिला आहे कि, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी जी कपात करण्यात येते त्यामध्ये घट करावी. जर हा निर्णय लवकर लागू झाला तर सरकारी नोकरदारांच्या हातात मिळणाऱ्या वेतनात भर पडू शकते.

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा किती हिस्सा भविष्य निर्वाह निधीसाठी कापण्यात यावा त्याचबरोबर याचा विचार कर्मचाऱ्याचे वय, लिंग आणि त्याच्या वेतनानुसार ठरवण्यात येणार आहे. मात्र कंपनीचा हिस्सा सध्या आहे तोच राहणार आहे.

आता काय आहेत नियम –

१) सध्या भविष्य निर्वाह निधीसाठी तुमच्या वेतनातील 24 टक्के रक्कम कापण्यात येते. यामध्ये 12 टक्के रक्कम हि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापली जाते तर 12 टक्के हिस्सा कंपनी जमा करत असते.

२) ज्या कर्मचाऱ्याचे मासिक वेतन 15 हजार रुपयांपर्यंत आहे त्याचा पीएफ कापणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर ज्या कंपनींमध्ये 20 कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12 टक्के रक्कम कपात करण्यात येते.

३) यासाठी नवीन विधेयक आणले जाणार असून Employees Provident Fund and Miscellaneous Bill 2019 असे या विधेयकाचे नाव आहे.

आरोग्यविषयक वृत्त –