सुशांत-दिशा सालियन यांच्याशी नाव जोडल्यानं सूरज पंचोलीनं दाखल केली FIR, मानसिक छळाचा आरोप

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन प्रकरणी अभिनेता सूरज पंचोलीवर सातत्याने आरोप होत होते. कधी त्याला या प्रकरणात ट्रोल करण्यात आलं, तर कधी फोटो व्हायरल करत दावा केला की, त्याचे दिशाशी कनेक्शन आहे. या सर्व आरोपांना कंटाळून सूरज पंचोलीने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार सोमवारी सूरज पंचोलीने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करत सुशांतसिंह राजपूत आणि दिशा प्रकरणात आपले नाव विनाकारण जोडले जात असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात सुरजने मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. असे म्हटले जात आहे की सूरज पंचोलीने बरीच मीडिया हाऊसेस, यूट्यूब आणि बर्‍याच लोकांविरूद्ध ही तक्रार केली आहे. बनावट बातम्यांद्वारे त्यांची प्रतिमा डागाळली जात असल्याचे अभिनेत्याने म्हटले आहे.

मानसिक छळ केल्याप्रकरणी दाखल केली तक्रार
बनावट बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्यांवर सूरज पंचोलीने गुन्हा दाखल केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की असे करून हे लोक त्याच्या मानसिक छळ करीत आहेत. या लोकांना शोषणासाठी जबाबदार धरले जावे आणि कडक कारवाई केली पाहिजे. दरम्यान सुरुवातीला सुरज पंचोलीचे नाव सुशांतसिंह राजपूतशी जोडले जात होते. यानंतर सूरज पंचोली स्वत: समोर आला आणि त्याने सांगितले कि, सुशांतशी तो केवळ दोनदा भेटला आहे, मग या प्रकरणात त्याचे नाव का घेतले जात आहे.

दिशा सालियनशी जोडले गेले सूरज पंचोलीचे नाव
अशी अफवा पसरण्यास सुरवात झाली होती कि, सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन आणि सूरज पंचोली यांच्यात संबंध होते, ज्यानंतर जेव्हा दिशा गर्भवती झाली तेव्हा तिला छतावरून खाली ढकलून मारण्यात आले. असे सर्व दावे सोशल मीडियावर केले जात होते.

काय म्हणाला सूरज पंचोली?
सुरज पंचोलीने यापूर्वी मुलाखतीत हे स्पष्ट केले होते की सुशांतला त्याने फक्त एक-दोन वेळा भेट दिली होती, तर त्यांना दिशा माहितदेखील नाही. असे खोटे आरोप करु नका, यामुळे तो आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा त्रास होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like