आत्महत्या करणारी सुशांतची Ex मॅनेजर होणार होती पांचोलीच्या मुलाची आई ? स्वतः सूरजनंच केला मोठा खुलासा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या 4-5 दिवस आधीच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. यानंतर या प्रकरणी सूरज पांचोली याच्यावर खूप टीका होताना दिसली होती. या सगळ्यानंतर आता सूरजरनं प्रतिक्रिया देत सर्वच चर्चांना पूर्ण विराम दिला आहे आणि काही खुलासे केले आहेत.

एका मुलाखतीत बोलताना सूरज म्हणाला, “मी दिशाला ओळखत नाही. मी तिला कधी भेटलो नाहीये. जेव्हा तिचं निधन झालं त्यानंतर मला तिच्याबद्दल समजत आहे. तेही मला सुशांतच्या निधनानंतर दिशाबद्दल सोशलच्या माध्यमातून समजलं आहे. मी कधी तिच्याशी बोललोही नाहीये. मला ती कशी दिसते हेही माहित नाही. जी या जगात आता नाहीये तिच्याबद्दल असं काही बोलणं हे योग्य नाही. त्या मुलीचं कुटंब, भाऊ आणि बहिणीबद्दल थोडा विचार करायला हवा.”

View this post on Instagram

#StopSpreadingFakeNews @sonupii

A post shared by Sooraj Pancholi (@soorajpancholi) on

सूरज पुढे बोलताना म्हणतो, “हे खूपच निराशाजनक आहे. कारण ती लोकं त्या व्यक्तीबद्दल बोलत आणि लिहित आहे जी या जगात नाही. लोकांकडे करण्यासाठी दुसरं काहीही नाही. मला असं वाटतं की, मी या सगळ्या बोलून माझा वेळ वाया घालवत आहे.”

नेमका प्रकार काय ?

सध्या सोशल मीडियावर अनेक युजर्स असा दावा करत आहे की, सूरज पांचोली सुशांतची एक्स मॅनजेर दिशा सालियान हिला डेट करत होता. काहींनी तर असाही दावा केलाय की, दिशा प्रेग्नंट होती. यामुळंच तिनं आत्महत्या केली आहे असंही सांगितलं जात होतं. सुशांतलाही हे माहित होतं आणि त्याला तिची मदत करायची होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like