Advt.

Sooryavanshi Movie | अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’वर भडकली अंडरवर्ल्ड ‘डॉन’ दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Sooryavanshi Movie | बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi Movie) हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची 150 कोटी रुपयांहून अधिकची कमाई झाली आहे. सूर्यवंशी चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असली तरी काहीं लोकांनी चित्रपटाच्या कंटेटवर आक्षेप नोंदवला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातने (Mahwish Hayat) या चित्रपटाच्या कंटेटवर आक्षेप नोंदवत ‘सूर्यवंशी’वर निशाणा साधला आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट इस्लामोफोबियाला (Islamophobia) प्रोत्साहित करतेय, असं महविश हयातने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. महविश हयात हि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची (Underworld don Dawood Ibrahim) गर्लफ्रेंड असल्याचे म्हंटले जाते.

महविश हयातने आपल्या ट्विटमध्ये ‘सूर्यवंशी’ हा इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देणारा बॉलिवूडमधील नवीन चित्रपट आहे. हॉलिवूडमध्ये गोष्टी बदलत आहेत आणि मला आशा आहे की सीमेपलीकडील लोकसुद्धा याचं पालन करतील. सकारात्मक चित्रण करायचे नसल्यास, कमीतकमी तुम्ही मुस्लिमांचं चित्रण करताना निष्पक्ष रहा. द्वेष पसरवू नका, दरी कमी करण्याचा प्रयत्न करा असे म्हंटले आहे.

तसेच दुसरीकडे पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील मोहम्मद जिब्रान नासिर यांनीसुद्धा ट्विट करत सूर्यवंशी (Sooryavanshi Movie) चित्रपटावर टीका केली आहे. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही, दुसऱ्या क्रमांकावरचा लोकप्रिय देश, 8 प्रमुख धर्म, 121 प्रमुख भाषा, 29 राज्ये आणि विविध संस्कृती, 4000 शहरे, 5500 वर्षांहून जुनी संस्कृती असूनही प्रत्येक मोठ्या चित्रपटात आता हिंदुत्वाचं कथन पुन्हा ठासून सांगावं लागतंय. भारत किती गरीब झाला आहे’, असं लिहित त्यांनी भारतातील चित्रपटांवर जोरदार टीका केली आहे.

 

Web Title : Sooryavanshi Movie | if not positive at least be fair when showing muslims mehwish hayat on sooryavanshi Akshay Kumar Underworld don Dawood Ibrahim marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक