सुर्यवंशी ट्रेलर : आतंकवाद्यांचा काळ बनून आला खिलाडी अक्षय कुमार, 2020 चा सर्वात मोठा अ‍ॅक्शन धमका

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – रोहित शेट्टीनं डायरेक्ट केलेल्या सूर्यवंशी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते सिनेमाच्या ट्रेलरची वाट पहात होते. आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे. अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ सिनेमात लिड रोलमध्ये आहेत. यावेळी या सिनेमात सिंघम आणि सिंबा असा दोन्हींचा तडका पहायला मिळणार आहे.

‘अशी’ आहे स्टोरी

सूर्यवंशी सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाच्या कथेविषयी काहीसा अंदाज येतो. अक्षय कुमार अँटी टेररिज्म स्क्वॉड कॉप आहे जो देशासाठी काहीही करायला तयार आहे. कॅटरीना कैफनं त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दोघांना एक मुलगाही आहे. त्यांना एका अज्ञात हल्ल्याची माहिती मिळते. यात वीर आपल्या मुलाला गमावतो. ट्रेलरच्या शेवटी दिसतं की, रणवीर सिंगची एन्ट्री होते. परंतु हे सरप्राईज नाहीये. रणवीरच्या एन्ट्रीनंतर अजय देवगणचीही धमाकेदार एन्ट्री होताना दिसते.

तररण आदर्शनं ट्रेलरवर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं अलीकडेच ट्रेलर लाँचिंगची रिलीज डेट सांगत ट्रेलरवर रिव्ह्यु दिला होता. त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “सूर्यवंशीचा ट्रेलर पाहिला. खूप शानदार आहे. रोहित शेट्टी नि:संदेह एंटरटेंमेंटचा सम्राट आहे. अक्षयला अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहून छान वाटलं. बॉक्स ऑफिसवर त्सुनामीसाठी तयार व्हा. हे मोठ्या विजयाचं वचन आहे. 2 मार्च 2020 रोजी एका इव्हेंटमध्ये सिनेमाचा ट्रेलर येणार आहे. सिंबा, सिंघम आणि सूर्यवंशी ट्रेलर लाँचमध्ये असतील.”