सूर्यवंशी ट्रेलर : रणवीरनं लिपस्टिकवरून केली कॅटरीनाची ‘बोलती’ बंद (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायरेक्टर रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील तिसरा सिनेमा असलेल्या सूर्यवंशी या सिनेमाचा ट्रेलर आजच(सोमवार दि 2 मार्च 2020) रिलीज झाला आहे. दीर्घकाळाासून चाहते ट्रेलरची वाट पहात होते. अखेर सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे. रिलीज होताच ट्रेलर युट्युबवर ट्रेंड करताना दिसत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान सिंघम सिनेमात काम केलेल्या अजय देवगणनं आणि सिंबा सिनेमात काम केलेल्या रणवीर सिंगनंही उपस्थिती दाखवली. सूर्यवंशीमध्ये रणवीर आणि अजयचीही एन्ट्री आहे. या ट्रेलर लाँचिंगदरम्यानचा कॅटरीना कैफ आणि रणवीर सिंगचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, स्टेजवर कॅटरीना कैफ, रणवीर सिंग, अक्षय कुमार, रोहित शेट्टी , अजय देवगण असे सारेच होते. कॅटनं अलीकडेच तिचा ब्रँड के (Kay) लाँच केला आहे. कॅटनं एक संधी पाहून रणवीर सिंगला विचारलं, तो तिच्या ब्रँडची लिपस्टिक का नाही लावत. रणवीरनं दिलेल्या उत्तरानं सारेच हसायला लागले. कॅटलाही हसू आवरलं नाही. रणवीर म्हणाला, “मला चेक निव्हिया(Nivea) देतं मॅडम. ज्या दिवशी के(Kay) मला चेक देईल मी के लावायला सुरुवात करेन.” रणवीरच्या उत्तरानं कॅटही शांत झाली आणि एकच हशा पिकला.

सूर्यवंशीच्या ट्रेलरला चाहत्यांना जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लोकांनी हा सिनेमा रिलीजआधीच हिट होणार असल्याचं सांगितलं आहे. काही युजर्सनं तर असंही सांगितलं की, हा सिनेमा 200 कोटींहून अधिक कमाई करेल. 24 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.