सोफिया हयातनं ‘बोल्ड’ बिकिनी घालून पाठीवर लावले ‘पंख’ ! म्हणाली – ‘एंजल्स कोणत्याही रुपात येऊ शकतात’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अभिनेत्री सोफिया हयात नेहमीच सोशलवर चर्चेचा विषय असते. याचे कारण म्हणजे तिचे हॉट फोटो. तिच्या बोल्ड अवताराचे अनेकजण दीवाने आहेत. सोफियाचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. असंच काहीसं पुन्हा एकदा झालं आहे. तिचा एक फोटो चर्चेत आला आहे ज्यात ती खूप बोल्ड दिसत आहे आणि तिनं यात एंजलसारखा लुक केला आहे. सध्या सोफियाचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

सोफियानं नुकताच एक फोटो इंस्टावरून शेअर केला आहे. फोटोत तिनं एंजलसारखा लुक केला आहे. यात तिनं पाठीवर पंखही लावले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बोल्ड बिकिनी घातली आहे. एंजल्स कोणत्याही रुपात येऊ शकतात असंही तिनं फोटो शेअर करताना म्हटलं आहे. सध्या तिचा हा फोटो खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे. कधी सोफिया चाहत्यांना इम्प्रेस करते तर कधी ट्रोलही होत असते. सोफिया अनेक बोल्ड फोटो बिंधास्तपणे सोशलवर शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी सोफियानं न्यूड फोटो शेअर केले होते त्यामुळे सोशलवर चांगलाच वाद झाला होता. तिचे हे नग्न रुप पाहून तिचे अनेक चाहते आणि नेटकरी खूपच भडकले होते. अनेकांनी संताप व्यक्त करत सोफियावर सडकून टीका केली होती. परंतु ती कधी कोणाल जुमानत नाही. कारण तिला काहीही फरक पडत नाही.

सोफियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोफियाचा जन्म 6 डिसेंबर 1984 मध्ये लंडनमध्ये झाला होता. 2002 मध्ये सोफियाने सिनेमाजगतात पाऊल टाकलं होतं. हॉलिवूड सिनेमांव्यतिरीक्त सोफिया हिंदी सिनेमांमध्येही दिसली आहे. भारतात ती बिग बॉसमध्ये आल्यानंतर खूप फेमस झाली. यानंतर तिनं काही सिनेमातही काम केलं आहे.