म्हणून प्रियांका चोपडाची जावूबाई सोफी टर्नरने लग्नाच्या 24 तास आधी केलं होतं पतीसोबत ब्रेकअप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही काळापूर्वीच गेम ऑफ थ्रोन्सची अभिनेत्री सोफी टर्नर आणि जो जोनास यांनी लग्न करत सर्वांनाच चकित केलं. या नव्या जोडीचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओज समोर आले होते. लग्नानंतर आता सोफीच्या लाईफशी निगडीत अनेक गोष्टींचे खुलासे होताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा तिने केलेल्या एका खुलाशाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे.

सोफीने नुकताच खुलासा केला आहे की, लास वेगासमध्ये लग्नापूर्वीच जो आणि तिचे ब्रेकअप झाले होते. सोफीने सांगितले की, लग्नाच्या तास आधी सोफी आणि जो वेगळे झाले होते. 24 तासांसाठी दोघांनीही ब्रेकअप केले होते.

View this post on Instagram

Me right now: 😍 #METGala

A post shared by J O E J O N A S (@joejonas) on

एका मुलाखतीत बोलताना सोफीने या ब्रेकअपचे कारणही सांगितले. सोफी म्हणाली की, “खरं हे ब्रेकअप एखाद्या भांडणामुळे नाही तर लग्नाआधी काही वेळ होणाऱ्या घबराटीमुळे झालं होतं. तो दिवस म्हणजे आमच्या दोघांच्याही आयुष्यातील वाईट दिवस होता. एका सेकंदासाठी आम्ही दोघेही थंड पडलो होतो. 24 तासानंतर मात्र दोघेही शांत मनाने सोबतच पुढे गेलो.”

View this post on Instagram

Is it Halloween yet? 🤤

A post shared by J O E J O N A S (@joejonas) on

पुढे सोफी म्हणते की, “जोनेच मला प्रेम करायला शिकवले आहे.” 2016 मध्ये हे दोघे पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी सोफीची मानसिक अवस्था काही ठिक नव्हती. ती खूपच वैतागलेली आणि दु:खी होती. तेव्हा जोनेच सोफीला आत्मविश्वास दिला होता. तो असेही म्हणाला होता की, जोपर्यंत सोफी स्वत:वर प्रेम नाही करत तोपर्यंत मी तिच्या सोबत नाही राहू शकत. सोफीच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी जोने बोललेल्या गोष्टींमुळे सोफीचा जीव वाचला आहे.

View this post on Instagram

I Win. 😍 @vanityfair

A post shared by J O E J O N A S (@joejonas) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like