‘लव्ह’ ‘दोस्ती’ आणि ‘ऍक्शन’चा ट्रिपल डोस ‘स्टूडेंट ऑफ द ईयर २’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : चित्रपट ‘स्टूडेंट ऑफ द ईयर २’ आज प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये टायगर श्रौफ सोबत बॉलीवूड मध्ये पदार्पण करणारी तारा सुतारिया आणि अनन्या पांडे त्याचासोबत चित्रपटात काम करणार आहेत. हा चित्रपट ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ चा दुसरा पार्ट आहे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर प्रेक्षकांना आता चित्रपटाची आतुरता लागली आहे. आणि सगळ्यांचे लक्ष आता चित्रपटाकडे लागले आहे. आताच बॉलीवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या तारा आणि अनन्या यांना पडद्यावर बघण्यासाठी सगळेच इच्छुक आहेत. चित्रपटाला घेऊन आता पर्यंत जो रिव्यु आला तो पूर्णतः हा मिळता जुळता आहे. काही लोकांना चित्रपट आवडला पण काही लोकांचा म्हण आहे की चित्रपट ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ ची कॉपी आहे.

चित्रपटाची कथा
‘स्टूडेंट ऑफ द ईयर २’ मध्ये सुद्धा पार्ट १ चा लव ट्रायएंगल दाखवला आहे. पार्ट १ मध्ये दोन मुल आणि एक मुलगी यांची कहाणी आहे तर पार्ट २ मध्ये दोन मुली आणि एक मुलगा अशी कहाणी आहे. सोबतच चित्रपटामध्ये आणखी खूप काही दाखवला आहे. चित्रपटामध्ये टायगरची इंट्री होती आणि तेंव्हापासूनच चित्रपट हीट होतो. देहरादून मधील सेंट टेरेसा कॉलेज मध्ये तो प्रवेश घेतो. कॉलेज मध्ये टायगर पोस्टर ब्वॉय आदित्य सील सोबत सामना करतो. दोघांना मध्ये स्टूडेंट ऑफ द ईयर २ ची ट्रॉफी घेण्यासाठी संघर्ष चालू असतो, पण कोणाचा हाती लागते ट्रॉफि हे बघण्यासाठी आपल्याला एकदा चित्रपट बघावा लागेल.

आत्ताच बॉलीवूड मध्ये पदार्पण केलेली अनन्या एका श्रीमंत घरातील मुलीची भूमिका करते आहे. व तारा सुतारिया डान्स कॉम्पेटिशन जिंकून एक चांगली डान्सर बनणार आहे अशी ती एका मुलीची भूमिका करणार आहे. चित्रपटामध्ये टायगर आणि आदित्य सील यांचा मध्ये ट्रॉफी कोण जिंकणार यासाठी भांडण चालू असते तर दुसरीकडे टायगर आणि अनन्या, तारा यांचा मध्ये लव ट्रायंगल दिसून येत आहे. चित्रपटामध्ये अशा अनेक गोष्टी आहे आणि त्या बघण्यासाठी आपल्यला सिनेमाघरा मध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद घेता येईल.

Loading...
You might also like