रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने तिच्या दुसऱ्या लग्नाबात पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सौंदर्या रजनीकांतने 11 फेब्रुवारी रोजी दुसरं लग्न केलं. बिझनेसमन आणि अभिनेता विशगन वांगामुडी सोबत तिने लग्न केलं. लग्नाच्या तीन महिन्यानंतर आता पहिल्यांदाच ती एका मुलाखतीत बोलली आहे. लग्नाच्या वेळीचा एक मजेदार किस्सा तिने या मुलाखतीत शेअर केला आहे. लग्नाचे विधी मी खूपच नर्व्हस होते असा खुलासा सौंदर्याने केला आहे. याचे कारणही तिने सांगतिले आहे.

मुलाखतीत बोलताना सौंदर्या म्हणाली की, “लग्नाचे विधी सुरु होते तेव्हा मी खूप नर्व्हस होते. कारण त्यावेळी माझा मुलगा माझ्या जवळ नव्हता. नवरा विशगनला ही बाब लक्षात आली. सौंदर्याचा नर्व्हसनेस पाहून विशगनला वाईट वाटले. त्यानेही वेद लग्नमंडपात येत नाही तोवर लग्न करणार नाही हट्टच धरला. त्यानंतर वेदला लग्न मंडपात आणण्यात आले. त्यानंतर आमचं लग्न झालं.

पुढे बोलताना ती म्हणाली की, “आमचा मुलगा वेद लग्नात असावा आणि त्याने सर्व काही पहावे अशी माझी आणि विशगनची इच्छा होती. त्यामुळे वेद लग्नमंडपात आल्यानंतर आमचे लग्न लागले. विशेष म्हणजे विशगनने वेदकडून माझ्याशी लग्न करण्याची परमिशन देखील घेतली होती.” असाही खुलासा सौंदर्यान केला आहे.

सौंदर्याने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत लग्न केले होते. लग्नापूर्वी चार वर्षे एकमेकांना डेट करणारे हे दोघे सप्टेंबर 2010 मध्ये विवाहबद्ध झाले होते. परंतु नंतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेले. 2016 मध्ये वाद खूपच वाढले. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पिता रजनीकांत यांनीही सौंदर्या आणि अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. नंतर दोघेही कायदेशीर घटस्फोट घेत वेगळे झाले होते. त्यानंतर सौंदर्याने ट्विटरवर ट्विट करत सांगितले होते की, “मी माझ्या पतीपासून विभक्त झाले आहे.”

यानंतर सौंदर्याने आता विशगनसोबत दुसरे लग्न केले आहे. विशिगनदेखील घटस्फोटीतच आहे. मॅगझिन एडिटर कनिका कुमारसोबत त्याने लग्नगाठ बांधली होती परंतु हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. विशिगन एका औषध कंपनीचा मालकदेखील आहे शिवाय त्याने चित्रपटातदेखील काम केले आहे. वंजगर उलगम या चित्रपटात त्याने डेब्यू केला आहे. वंजगर उलगम या चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले आहे. सौंदर्या ही देखील दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती आणि दिग्दर्शक आहे.

Loading...
You might also like