BCCI अध्यक्ष सौरभ गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल

कोलकाता : वृत्तसंस्था –  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BBCI) अध्यक्ष सौरभ गांगुली याची प्रकृती पुन्हा बीघडली आहे. त्यामुळे सौरभला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोलकता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मंगळवारी (दि.26) रात्री त्याच्या छातीत पुन्हा दुखू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता.

सौरभ गांगुली याच्यावर काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील बूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी आल्यानंतर काल रात्री पुन्हा छातीत दुखू लागले. त्यामुळे तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. आरे ला कारेनं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं संघातील खेळाडूंना प्रतिस्पर्धी खेळाडूंना भिडण्याची ताकद दिली. सौरभ गांगुली याने BBCI चा अध्यक्ष झाल्यानंतर अनेक चांगले उपक्रम राबवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटात देखील इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडले. गांगुलीने 113 कसोटीत 42.17 च्या सरासरीनं 7212 धावा केल्यात आहेत. यामध्ये 16 शतकं आणि 35 अर्धशतकं आहेत.