Sourav Ganguly Biopic | लवकरच येणार क्रिकेटपट्टू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित बायोपिक; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sourav Ganguly Biopic | क्रिकेटचा एक काळ गाजवलेला स्टार क्रिकेटपट्टू सौरव गांगुली याच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपट येणार आहे. भारतीय संघातील या महत्त्वपूर्ण खेळाडूबद्दल आजही भारतीयांच्या मनात आपुलकी आहे. सौरव गांगुलीच्या बायोपिक (Sourav Ganguly Biopic) चित्रपटाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यामध्ये क्रिकेटर सौरवच्या मुख्य भूमिकेत अभिनेता आयुष्मान खुराणा (Actor Ayushmann Khurrana) दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. चित्रपटाचे निर्माते मागील काही महिन्यांपासून आयुष्मानशी कामाबाबत चर्चा करत आहेत. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असून स्वाक्षरीच्या आधीच्या औपचारिकता पूर्ण करण्याचे काम सुरु आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत (Rajinikanth’s Daughter) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) करणार आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, लव्ह फिल्म्स (LUV Flims) निर्मिती संस्था बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुरानाशी (Sourav Ganguly Biopic ) या चित्रपटाविषयी बोलणी करत आहे. चर्चा आता अंतिम टप्यावर पोहोचली असून अधिकृतपणे घोषणा करणे बाकी आहे. सौरव गांगुली हा डावखुरा फलंदाज (Left Handed Batsman) होता त्यामुळे या भूमिकेसाठी आयुष्मान हाच सर्वात्तम पर्याय असल्याची खात्री निर्मात्यांना आहे.

https://twitter.com/Rahulrautwrites/status/1663177778366382080?s=20

आयुष्मानने देखील या बायोपिकच्या (Biopic) कास्टिंगला मान्यता दिली असून लवकरच त्याची निर्मात्यांशी वैयक्तिकरित्या भेट होणार आहे.
हा चित्रपट क्रिकटरचे आयुष्य मांडणारा असल्याने खूप शॉट मध्ये क्रिकेटसीन असणार आहेत.
यासाठी आयुष्यमानला शूटिंग सुरू करण्यापूर्वी क्रिकेटचे धडे गिरवावे लागणार आहेत.
त्याच्या क्रिकेटच्या प्रशिक्षणानंतर (Cricket Training) शूटिंग सुरू होईल असे निर्मात्याचे म्हणणे आहे.
तसेच या बायोपिकच्या (Sourav Ganguly Biopic) दिग्दर्शनाची धुरा रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या
सांभाळणार आहे. ऐश्वर्या ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
नुकताच तीने अभिनेता धनुष याच्यासोबत १८ वर्षाच्या संसारातून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यामुळे ती
चर्चेचे कारण बनली होती. आता तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेचे कारण बनली आहे.

Advt.

Web Title : Sourav Ganguly Biopic | A biopic based on the life of Cricketpattu Sourav Ganguly; The role will be played by the Bollywood actor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंची लाचारी!!’, ‘ते’ फोटो ट्विट करत भाजपचा टोला

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 मोबाईलवर संपर्क साधा, जाणून घ्या नंबर

Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)