BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे भाऊ स्नेहाशीष ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

कोलकाता : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा कहर सतत वाढत चालला आहे. दररोज कोरोना व्हायरसच्या नव्या संक्रमित रूग्णांची संख्या वाढत आहे. देशात आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोना व्हायरस संक्रमित आढळले आहेत. आता भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा भाऊ सुद्धा कोरोना व्हायरसने संक्रमित आढळला आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांचे भाऊ स्नेहाशीष गांगुली कोरोना व्हायरसने पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सौरव गांगुली आणि त्यांचे भाऊ स्नेहाशीष गांगुली एकाच घरात वेगवेगळ्या फ्लोअरवर राहतात.

यापूर्वी जूनमध्ये स्नेहाशीष गांगुली कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु, तेव्हा स्नेहाशीष गांगुली कोरोना व्हायरसने संक्रमित असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सिद्ध झाले होते. याबाबत क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) ने स्पष्टीकरण सुद्धा दिले होते.

जून महीन्यात स्नेहाशीष गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा असल्याचे सीएबीने तेव्हा स्पष्ट केले होते. सीएबीने म्हटले होते की, त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे नाहीत. सौरव गांगुलीचे मोठे भाऊ स्नेहाशीष गांगुली हे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) चे सचिव आहेत.