गृहमंत्री अमित शहांचा डोना गांगुलीस कॉल, दादाच्या प्रकृतीबाबत हॉस्पीटलकडून मोठं अपडेट, जाणून घ्या

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला हृदयविकाराचा सौम्य धक्का बसल्याने वूडलॅन्ड्स रुग्णालयात दाखल केले होते. आता त्याच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गांगुलीची पहिली एन्जियोप्लास्टी (Angeoplasty) करण्यात आली आहे. यामध्ये त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेन टाकली आहे. गांगुलीच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत. एका रक्तवाहिनीत 90 टक्के ब्लॉकेज आहे. सर्जरीनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवसांत त्याच्या हृदयात आणखी दोन स्टेन टाकले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुलीला फोन करून त्याच्या तब्येतीविषयीची माहिती जाणून घेतली आहे. याशिवाय केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजूजू यांनीही डोना गांगुलीला फोन करून चौकशी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही रुग्णालयात जाऊन सौरव गांगुलीची भेट घेणार आहेत.

घरामध्ये ट्रेड मिलवर व्यायाम करताना गांगुलीच्या छातीत दूखत होत होत. त्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली आणि डोक दूखू लागल. त्यामुळे दुपारी एक वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्याचा पल्स रेट 70 प्रती मिनीट तर ब्लड प्रेशर 130/80 MM एवढ होत. गांगुलीच्या कुटुंबातही अनेकांना याआधी हृदयविकाराचा त्रास होता.

काय म्हणाले डॉक्टर?
सौरव गांगुलीला सौम्य असा हृदयविकाराचा धक्का लागला, तो योग्यवेळी रुग्णालयात आला. आता त्याची तब्येत स्थिर आणि चांगली आहे, असे वूडलॅन्ड्स रुग्णालयाचे डॉक्टर खान यांनी सांगितले आहे.