बंगालमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणात येण्याच्या प्रश्नावर गांगुलीने दिले ‘हे’ उत्तर

कोलकाता : वृत्त संस्था – बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या राजकीय एंट्रीचा अंदाज वाढला आहे. यावरून सोमवारी सौरव गांगुलीने आजतकशी केलेल्या चर्चेत सांगतले की, जीवनाने मला अनेक संधी दिल्या आहेत, पाहुयात पुढे काय होतेय. आता मी बरा आहे आणि काम सुरू करणार आहे. चर्चेच्या दरम्यान गांगुलीने क्रिकेटशी संबंधीत अनेक प्रश्नांवर थेट उत्तरे दिले.

रविवारी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक रॅलीला संबोधित केले होते. या रॅलीमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सुद्धा सहभागी होणार असल्याबाबत बोलले जात होते, परंतु या रॅलीत सौरव गांगुली सहभागी झाला नाही. सौरव गांगुलीला 2 जानेवारीला हार्ट अटॅक आला होता. आता तो ठिक आहे.

काय म्हणाले होते दिलीप घोष?
काही दिवसांपूर्वी बंगाल भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी सौरव गांगुली पक्षात येण्याबाबत चर्चा केली होती. दिलीप घोष म्हणाले होते की, सौरव गांगुलीबाबत ज्या बातम्या येत आहेत त्यांच्यात काहीही दम नाही. सौरव गांगुलीने अजूनपर्यंत काहीही म्हटलेले नाही आणि भाजपाने सुद्धा म्हटलेले नाही. जर तो आला तर चांगलेच आहे. पार्टीत जे येतील, आम्ही त्यांचे स्वागत करू. परंतु, अजूनपर्यंत सौरभ सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही.