Lockdown : IPL बद्दल सौरभ गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला – ‘यावेळी विसरून जावा टूर्नामेंट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बीसीसीआय लवकरच आयपीएलबाबत मोठा निर्णय घेऊ शकेल. विम्बल्डन आणि ऑलिम्पिक खेळांना याआधीच कोरोनामुळे ग्रहण लागले आहे. अश्यात आयपीएलचे आयोजन कसे करता येईल? सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे आणि 30 एप्रिलपर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलच्या 13 वे सीजनचे आयोजन होण्याची शक्यता देखील नाही च्या बरोबर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. सध्याच्या परिस्थितीत याचा विचार करता येणार नसल्याचे गांगुलीने यावेळी सांगितले.

सौरव गांगुली म्हणाले की, सध्या अस्तित्वात असलेल्या परिस्थितीत आयपीएल आयोजित करणे कठीण आहे. आम्ही परिस्थिती पहात आहोत. यावेळी आपण काहीही बोलू शकत नाही. विमानतळ बंद आहेत, लोक घरात अडकले आहेत, कार्यालये बंद आहेत, कोणीही कोठेही जाऊ शकत नाही आणि असे दिसते आहे की मेच्या मध्यापर्यंत हे सुरूच राहील.

काय म्हणाले गांगुली?
गांगुली पुढे म्हणाले की, जेव्हा संपूर्ण जगात सर्व काही बंद आहे, तेव्हा खेळाडू कसे येतील. खेळाडूंशिवाय स्पर्धा आयोजित करणे अशक्य आहे. ही अगदी कॉमन सेन्सची गोष्ट आहे, संपूर्ण जगात कोणत्याही खेळाच्या बाजूने काहीही नाही, आयपीएल तर विसरूनच जा. गांगुली पुढे म्हणाले की, सोमवारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतरच परिस्थिती साफ होईल. जगात अश्या प्रकारची असताना खेळाचे भवितव्य काय असेल. आयपीएल बहुधा मेमध्येही होणार नाही. आयपीएल होणार नसल्याने बीसीसीआय आणि सर्व फ्रँचायझी संघांचे मोठे नुकसान होईल.