MS धोनीच्या निवृत्तीवर सौरव गांगुली म्हणाला – ‘चॅम्पियन संपत नसतात, जेव्हा मी आहे…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज त्याने आपल्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला असून भारतीय संघाचा केवळ चौथा खेळाडू आहे ज्याने बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाबरोबरच प्रशासनामध्ये देखील मोठे बदल करण्याचे आव्हान गांगुलीपुढे आहेत.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीविषयी भाष्य केले. यावेळी गांगुलीने धोनीच्या निवृत्तीविषयी बोलताना म्हटले कि, धोनी हा एका महान खेळाडू असून मी अध्यक्ष असेपर्यंत प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जाईल. तसेच चॅम्पियन खेळाडू लवकर संपत नाहीत असेदेखील त्याने यावेळी म्हटले. तसेच धोनीने निवृत्तीची काही चर्चा केली आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गांगुली म्हणाला कि, खेळाडू संघाबाहेर गेल्यानंतर या चर्चा होतातच , मात्र मीदेखील यातून बाहेर आलो आहे. त्यामुळे तो देखील तसे करू शकतो.

धोनीनेच घ्यायचा आहे निर्णय
याचबरोबर त्याच्या निवृत्तीवर आम्ही काहीही निर्णय घेणार नसून त्यानेच याचा निर्णय घ्यायचा आहे. मॅनेजमेंट देखील त्याच्यावर कोणताही दबाव टाकणार नसून मी अध्यक्ष आहे तोपर्यंत प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जाणार आहे.

अनेक दिवसांपासून चर्चा
महेंद्रसिंह धोनी हा वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्त होईल, असे बोलले जात होते, मात्र अजूनपर्यंत धोनीने याविषयी काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे या दौऱ्यावर त्याची निवड होते कि नाही याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या मॅनेजरने यावर बोलताना सांगितले कि, तो इतक्यात निवृत्ती स्वीकारणार नसून भविष्याचा निर्णय तो घेईल.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु आहेत. मात्र धोनीचे यावर काहीही भाष्य आलेले नसल्याने अनेकांना त्याच्या निवृत्तीचे वेध लागले आहेत. दरम्यान, बीसीसीआयने देखील अद्यापपर्यंत त्याच्या निवृत्तीवर कोणतेही भाष्य केले नसून अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार धोनी लवकरच यावर निर्णय घेणार आहे.

 

Visit : Policenama.com