Sourav Ganguly Resign As BCCI President? | सौरव गांगुलीचा BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा ?; ट्विट करत म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sourav Ganguly Resign As BCCI President? | प्रेमाने दादा म्हणून ओळखले जाणारे, एक भारतीय क्रिकेट प्रशासक, समालोचक आणि माजी राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला अशी चर्चा आहे. सौरव गांगुली यांनी भावूक ट्विट केलं आहे. त्याचबरोबर सौरव गांगुलीने आगामी वाटचालीसाठी समर्थनही मागितलं आहे.

सौरव गांगुलीने ट्विट करत म्हटलं आहे की, “2022 साल माझ्यासाठी खूप महत्वाचं वर्ष आहे. कारण, क्रिकेटमध्ये करिअर सुरु करुन 30 वर्ष पूर्ण झाली. 1992 साली क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. तीस वर्षांच्या प्रवासामध्ये क्रिकेट खेळत असताना सर्वांकडूनच पाठींबा मिळाला (Sourav Ganguly Resign As BCCI President?). क्रिकेटने मला खूप काही दिले. या प्रवासात मला अनेकांनी मदत केली, त्या सर्वांचे धन्यवाद. आता नवीन इनिंग सुरुवात करणार आहे. यामध्ये सर्वांचा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा असल्याचं,’ ते म्हणाले.

 

Web Title :-  sourav ganguly resign as bcci president? former captain s tweet goes viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा