BCCI च्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली तर सचिवपदी जय अमित शहा, राजीव शुक्लांची घोषणा

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या रेसमध्ये गांगुली सर्वात पुढे होता. त्याचबरोबर भारताचा माजी खेळाडू बृजेश पटेल देखील या रेसमध्ये सामील होता. मात्र गांगुलीने त्याला मागे टाकत हे पद मिळवले.

अध्यक्षपदाबरोबरच अन्य पदांसाठी देखील निवड झाली असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याची सचिवपदी निवड करण्यात आली असून अरुण धूमल यांची खजिनदारपदी नियुक्ती केली आहे. राजीव शुक्ला यांनी या निवडीची घोषणा केली आहे. अरुण धूमल हे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ आहेत.

दरम्यान, 47 वर्षीय सौरव गांगुली सध्या पश्चिम बंगाल क्रिकेट असोसीएशनचा अध्यक्ष असून त्याची आता या पदावर निवड झाली असून तो सप्टेंबर 2020 पर्यंत या पदावर राहणार असल्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com