बायोपिकमध्ये काम करण्याकरिता ऋतिक रोशनसमोर सौरव गांगुलीनं ठेवली ‘ही’ अट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सौरभ चंडीदास गांगुली… भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेटचा ‘दादा’ या नावाने एकेकाळी भारतीयांवर गारुड केले होते. त्याच्या बायोपिकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नुकतीच एक बातमी आलेली की सौरभ गांगुलीच्या बायोपिकमध्ये हृतिक रोशन आपली भूमिका साकारु शकतो. ह्रतिकला सुद्धा याबाबत काही हरकत नाही. पण सौरभ गांगुलीने यासाठी एक अट ठेवली आहे.

‘दादा’ने घातली ‘ही’ अट
मागील अनेक दिवसांपासून सौरभ गांगुलीच्या बायोपिकची चर्चा सुरु आहे. अलीकडेच नेहा धुपियाने तिच्या चॅट शोमध्ये सौरभ गांगुलीला आपल्या भूमिकेत कोणता अभिनेता बघायचा आहे, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा ह्रतिक रोशनचे नाव त्यांना सुचवले असता त्याने म्हटलं की, आधी ह्रतिकला त्याच्यासारखी बॉडी तयार करावी लागेल.

सौरभ म्हणाला, ह्रतिकला आधी माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल. लोक म्हणतात की, हृतिक रोशनची बॉडी किती चांगली आहे. मात्र माझ्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी माझ्यासारखीच बॉडी बनवावी लागेल.

ह्रतिक लवकरच ‘कृष ४’ मध्ये दिसणार आहे. सध्या त्याची स्क्रिप्ट लिहली जात आहे. यावर्षीच्या अखेरीस सिनेमाची शूटिंग सुरु अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ह्रतिकने २०१९ मध्ये दोन एका पाठोपाठ एक हिट सिनेमे दिले होते. त्यात वॉर हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. २०१९ मध्ये आपल्या दमदार अभिनय आणि परफॉर्मसोबत ह्रतिकचा बोलबाला पाहायला मिळाला होता. ज्यात ३०० करोड क्लबमध्ये प्रवेश करत त्याने सर्व रेकॉर्ड मोडले होते.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like