शिवसेना – 16, राष्ट्रवादी – 15 आणि काँग्रेसकडे 13 विभाग, खाते वाटप ठरल्याची सुत्रांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना प्रमुख आणि महाविकासआघाडीचे नेते उध्दव ठाकरे हे उद्या (गुरूवार) सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सरकारमध्ये कोण-कोण मंत्री असतील आणि कोणते विभाग कोणत्या पक्षाकडे असतील याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, शिवसेनेच उध्दव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आज (बुधवार) चर्चा झाली. त्यामध्ये 16-15-13 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडे एकुण 16 विभाग असणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नगरविकास, माहिती व प्रसारण, पर्यावरण, एमएसआरडीसी, संसदीय कामकाज, वाहतूक, राज्य उत्पादन, जीएसटी आणि इतर विभागांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडे 15 विभाग असून त्यामध्ये प्रामुख्याने गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, सहकार, वैद्यकीय शिक्षण, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, ग्राम विकास खात्यासह इतर विभागांचा समावेश आहे तर काँग्रेसकडे 13 विभाग असणार आहेत. त्यामध्ये कृषी, महसूल, गृहनिर्माण, महिला व बालकल्याण, उच्च शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा, उर्जा खात्यासह इतर खात्यांचा समावेश असणार आहे.

Visit : Policenama.com