अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी दक्षिण आफ्रिकेतून फरार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आफ्रिकेतील सेनेगलमध्ये राहत असलेला अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी सेनेगस कोर्टाने जामीन मंजूर करताच फरार झाला असल्याचे वृत्त आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा पुजारीवर लक्ष ठेवून होती. यंत्रणेच्या माहितीनुसार पुजारीला अटक झाली होती. जर रवी पुजारी सेनेगलच्या बाहेर गेला तर त्याला शोधणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. रवी पुजारीला याच वर्षी २१ जानेवारीला अटक करण्यात आली होती.

रवी पुजारी विरोधात भारतामध्ये २०० हून अधीक गुन्ह्यांची नोंद आहे. भारतात अटक टाळण्यासाठी त्याने भारतातून पलायन केले. सेनेगलला येण्यापूर्वी पुजारी बर्किना फासो येथे राहत होता. पुजारीला भारतात आणण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणाने हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र त्याला जामीन मिळताच तो फरार झाला आहे.

पुजारी सेनेगलमधून पळून गेला असल्याच्या वृ्त्ताला अद्याप कोणत्याही अधिका-याने दुजोरा दिला नाही. कर्नाटक पोलिसांच्या सुत्रानुसार तो सेनेगलमधून इतर देशात पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. रवी पुजारीने भारत सोडल्यानंतर त्याने आपले नाव बदलले आहे. त्याने बुर्किना फासो या देशाचे नागरिकत्व घेतल्याचा दावा करण्यात येत असून तो अँथनी फर्नांडीस नावाने राहत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भारताकडून रवी पुजारीला अटक करण्याच्या हलचाली सुरु झाल्याने पुजारीने अटक टाळण्यासाठी स्वत:वर खोटा गुन्हा दाखल करून घेतला. त्यान स्वत:वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला. त्यामुळे सेनेगलबाहेर जाता नेता येऊ नये असा उद्देश पुजारीचा होता. या गुन्ह्यामध्ये न्यायालयानेही रवी पुजारीला निकाल लागेपर्यंत देश न सोडण्याचे आदेश दिले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज