बेडरूमचे सीन्स करून खुप थकलेय, चांगला रोल दिला तर फीस कमी करेल, अभिनेत्रीनं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – साऊथ इंडियन सिनेमातील चर्चित अ‍ॅक्ट्रेस एंड्रिया जेरेमिया हिनं आपल्या कामानं लाखोंच्या मनात घर केलं आहे. अलीकडेच तिनं तिच्या कामाबद्दल काही भाष्य केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. बेडरूम सीन करून आता मी थकले आहे. अनेक सिनेमात बोल्डी सीन्स केले आहेत असं ती म्हणाली आहे. याशिवाय अनेक सिनेमात तिला असेच सीन मिळतात असंही तिनं सांगितलं.

एंड्रिया एका मुलाखतीत बोलताना म्हणाली, “मी अनेक सिनेमात बोल्ड आणि बेडरूम सीन दिले आहेत. एकाच प्रकारचे सीन करून आता मी थकले आहे. मला लवकरच कोणीतरी आता चांगला रोल ऑफर करायला हवा. जर मला तो रोल आवडला तर मी माझी फीदेखील कमी करायला तयार आहे.” असंही ती म्हणाली आहे.

एंड्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती तलपती विजय याच्या मास्टर सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिची महत्तवपूर्ण भूमिका असणार आहे. लास्ट टाईम ती Vada Chennai या सिनेमात दिसली होती. वेतीमारन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात तिचे बेड सीन होते. एंड्रियानं गौतम वासुदेव मेनन दिग्दर्शित सिनेमा Pachaikili Muthucharam मधून डेब्यू केला होता. डेब्यू आधी तिनं Naal Mudhal या कन्नड सिनेमात काम केलं होतं. यात तिचा लहान रोल होता.

https://www.instagram.com/p/Br-xQa3BAkP/