लग्नानंतर इतर हिरोईन्ससोबत काम नाही करणार वरुण धवन ? अभिनेत्रीच्या कमेंटची जोरदार ‘चर्चा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या लग्नानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेक चाहत्यांसह सेलेब्सही त्याला शुभेच्छा देत आहेत. अ‍ॅक्ट्रेस श्रद्धा श्रीनाथ (Shraddha Srinath) हिनंही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु तिनं सारकास्टिक पद्धतीनं वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिच्या या हटके शुभेच्छांची सोशलवर चर्चा होताना दिसत आहे.

श्रद्धानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं लिहिलं की, याचं दु:ख आहे की, आता आपण त्याला स्क्रीनवर परत पाहू शकणार नाही. स्पष्ट आहे की, त्याच्या सासरचे आता त्याला इतर हिरोईन सोबत काम करताना पाहू शकणार नाहीत. असंही होऊ शकतं तो आता मेल ओरिएंडेट सिनेमे करेल. तो आता त्याच्या पर्सनल आणि वर्क लाईफमध्ये कसा बॅलन्स करेल. अवघड आहे. त्याला मिस करू. तरीही शुभेच्छा वरुण.

श्रद्धानं दिलेल्या या हटके शुभेच्छा साऱ्यांचं लक्ष वेधत आहेत. सध्या तिच्या इंस्टा स्टोरीचे स्क्रीनशॉटही सोशलवर व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती अ‍ॅक्टर आर माधवन सोबत मारा या सिनेमात दिसली आहे. या सिनेमात तिचं खूप कौतुक झालं. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.