अमोल मुजुमदार करणार भारताविरूध्द खेळणार्‍या ‘या’ देशाला मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी फलंदाज यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फलंदाजीचे धडे देणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर असून याठिकाणी तीन कसोटी सामन्यांची  मालिका खेळणार आहेत. त्याचवेळी बरोबर दक्षिण आफ्रिकेने  भारताचा माजी फलंदाज अमोल मुजुमदार याला फलंदाजी प्रशिक्षकपदी नेमले आहे. या कसोटी मालिकेत फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्यासाठी आफ्रिकेच्या संघाने हा निर्णय घेतला आहे.

याविषयी माहिती देताना दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक कॉरी वेन जिल यांनी सांगितलं की, अमोल मुजुमदार हे या दौऱ्यात आमच्या खेळाडूंना चांगले मार्गदर्शन करू शकतात. त्यांच्याकडे भारतात खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे आमच्या फलंदाजांची ते अतिशय योग्य मार्गदर्शक असून त्यांनी अनेक फलंदाजांना आधी मार्गदर्शन देखील केले आहे.

मुजुमदार यांनी मुंबईकडून स्थानिक स्पर्धांमध्ये खेळताना प्रथम श्रेणीमध्ये एकूण 11 हजार 167 धावा  केल्या आहेत. मात्र त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेर त्याने 2014 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्याकडे प्रशिक्षणाचे हाय परफॉर्मन्स कोचिंग सर्टीफिकेट देखील आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी ती इतर फलंदाजांऐवजी जास्त उजवा ठरतो. त्याने याआधी डिसेंबर 2013 मध्ये नेदरलँडच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका या भारतीय  दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये देखील आघाडी घेण्याच्या विचाराने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like