क्रिकेट : मालिकेआधीच 2 खेळाडू आणि स्टाफ ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नुकतीच क्रिकेट सामने सुरु होणार असल्याचे समजले होते. मात्र, आता क्रिकेट सामन्यांना आता धक्का बसला आहे. जो खेळाडू फीट आहे त्यालाच आता मैदान उतरवले जाईल, असे समजते. कारण, दोन खेळाडू आणि त्यांच्या स्टाफला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नुकतीच सुरुवात झालीय. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघाने पुन्हा एकदा क्रिकेट सामने सुरू केल्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. यंदा आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप स्थगित केला असला तरी आयपीएलचा 13वा हंगाम युएईमध्ये होणार आहे. त्यात आता आयपीएलच्या 13 व्या हंगामाची घोषणा देखील झाली. मात्र, याचत कोरोना लागण झाल्याची बातमी समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघातील तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असून या तिन्ही खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आफ्रिकेचा महिला संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. त्याआधी ट्रेनिंग कॅम्पमध्ये घेतलेल्या खेळाडूंच्या कोरोना चाचणीत ही माहिती समोर आली.

दक्षिण आफ्रिकेने 27 जुलैपासून क्रिकेट ट्रेनिंग कॅम्प आयोजित केला आहे. यात सहभागी होण्यासाठी आलेल्या दोन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर एका सपोर्ट स्टाफची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. या तिघांना तातडीने कॅम्पमधून स्वतंत्रपणे क्वारंटाइन केले आहे.

आफ्रिकेच्या बोर्डाने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. कॅम्पमधील दोन क्रिकेटपटू आणि एक स्टाफ यांना करोनाची लागण झालीय. या सर्वांना 10 दिवसासाठी क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे या तिघी ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होणार नाहीत.

या तिघींच्यात करोना संदर्भात कोणतेही लक्षण आढळले नव्हते. तरीही वैद्यकीय टीम सर्वांवर लक्ष ठेवून आहे. करोना संदर्भातील प्रोटोकॉलनुसार त्यांची प्रकृती उत्तम आहे. सर्व खेळाडू ट्रेनिंग कॅम्पमध्ये असून वैद्यकीय टीमने आखून दिलेले प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे, असेही बोर्डाने सांगितले आहे.

करोना विषाणूमुळे तीन महिन्याहून अधिक काळ क्रिकेट स्पर्धा झाल्या नाहीत. अशात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज बोर्डाने धाडसी निर्णय घेत कसोटी मालिकेचे आयोजन केले आहे. दोन्ही संघादरम्यानचा तिसरा आणि अखेरचा सामना सध्या सुरू आहे.

या मालिकेच्या यशस्वी आयोजनामुळे अनेक देशांनी क्रिकेट सुरूवात करण्याची प्रक्रिया सुरू केलीय. वेस्ट इंडिज दौर्‍यानंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे.