धक्कादायक ! दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट मंडळ अखेर बरखास्त, सर्व सदस्यांचा राजीनामा

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था –    दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट मंडळ (South African Cricket Board) अखेर बरखास्त झालं आहे. त्यामुळं आज क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेट मंडळाच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिल्यानं हे मंडळ बरखास्त झालं आहे. यानंतर आता या प्रकरणाला मोठं वळण लागलं आहे. आता देशातील ऑलिम्पिक समिती (Olympic Committee) काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळात मोठा भ्रष्टाचार झाल्यांच दिसून आलं होतं. या मंडळातील एका मुख्य अधिकाऱ्याला यामुळं आपलं पदंही सोडावं लागलं होतं. यानंतर या प्रकरणी चौकशी समितीही नेमण्यात आली होती. परंतु या चौकशी समितीचा अहवाल आम्ही सार्वजनिक करणार नाही अशी भूमिका दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळानं घेतली होती. परंतु त्यानंतर सरकारचं दडपण वाढलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला हा अहवाल सार्वजनिक करावा लागला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट मंडळानं एक पत्रक काढलं आहे. यात मंडळानं असं नमूद केलंय की, क्रिकेटच्या हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळातील सर्व सदस्यांनी आपलं पद सोडलं आहे. आम्ही सर्वांनी विचार विनिमय करून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळातील पदांचा राजीनामा दिला आहे.

यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळात काही दिवसात मोठा बदल झालेला पाहायला मिळू शकतो. कारण दक्षिण आफ्रिकेची ऑलिम्पिक समिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाचा पूर्ण ढाचा बदलणार आहे असं समजत आहे. ही समिती आता कामालाही लागली आहे.

दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबरपासून स्थानिक क्रिकेटला सुरुवात होणार आहे. त्यामुळं नोव्हेंबरपूर्वी दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट मंडळ नव्यानं स्थापन करावं लागणार आहे. आता या कमी कालावधीत या क्रिकेट मंडळात नेमका काय बदल केला जातो याकडे सर्वांचं लक्ष आहे. या बदलांनंतर खेळ आणि खेळाडू यांच्यावर नेमके काय परिणाम होऊ शकतात याची उत्सुकता जगभरातील चाहत्यांना नक्कीच लागली आहे.