श्रीलंकेचा दावा : 5 हजार वर्षांपुर्वी राजा रावणानं केला होता विमानाचा वापर, पुरावे गोळा करण्यासाठी चक्क छापली जाहिरात

कोलंबो : सध्या श्रीलंकेत राजा रावणाची लोक खुप चर्चा करत आहेत. पौराणिक कथांनुसार महाकाव्य रामायणाचे खलनायक रावण हे प्रभू श्रीरामांच्या काळात श्रीलंकेचे राज्यकर्ते होते. ते भारतातील हिंदूंसाठी राक्षस असले तरी श्रीलंकेतील लोकांसाठी ते महान राजा होते. यादरम्यान श्रीलंकेच्या सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध करून लोकांना रावणाबाबत काही कागदपत्रं, पुरावे असल्यास शेयर करण्याचे आवाहन केले आहे. ही जाहिरात पर्यटन आणि उड्डाण मंत्रालयाने वेगवेगळ्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली आहे.

कागदपत्र शेयर करण्यासाठी दिली जाहिरात
जाहिरातीत लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी राजा रावणाच्या संबंधित कुठलेही कागदपत्र किंवा पुस्तके शेयर करण्यास सांगितले आहे, जेणेकरून सरकारला पौराणिक राजा आणि गमावलेल्या वारसा, यावर एक महत्वाकांक्षी रिसर्च करण्यास मदत होऊ शकते. श्रीलंकन सरकारचे म्हणणे आहे की, रावण जगातील पहिला विमान चालक होता आणि त्याने 5,000 वर्षांपूर्वी उड्डाण घेतले होते. देशाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने प्राचीन काळात उड्डाण भरण्यासाठी वापरण्यात आलेली पद्धत समजून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

ही पौराणिक कथा नाही, सत्य आहे !
कोलंबोहून टेलीफोनवर न्यूज 18 शी चर्चा करताना, सिव्हिल अव्हिएशन अथॉरिटीचे माजी उपाध्यक्ष शशी दानतुंज यांनी म्हटले की, त्यांच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी भरपूर पुरावे आहेत की, रावण विमानाचा वापर करणारा पहिले व्यक्ती होते. ते पुढे म्हणाले, राजा रावण एक प्रतिभाशाली व्यक्ती होते. ते उड्डाण घेणारे पहिले व्यक्ती होते. ही पौराणिक कथा नाही. हे एक सत्य आहे. यावर एक सविस्तर संशोधन करण्याची गरज आहे. पुढील पाच वर्षात, आम्ही हे सर्व सिद्ध करू.

5,000 वर्षापूर्वी केले होते उड्डाण !
मागच्या वर्षी नागरी उड्डाण तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्ववादी, वैज्ञानिक आणि भूवैज्ञानिकांचे एक संमेलन कटुनायकेमध्ये आयोजित करण्यात आले होते. येथे श्रीलंकेचे सर्वात मोठे विमानतळ बंदरानाइक येथे आहे. संमेलनात निष्कर्ष काढण्यात आला होता की, रावणाने 5,000 वर्षांपूवी श्रीलंकेहून आजच्या भारतासाठी उड्डाण घेतले होते आणि परतले होते.

दयाळू राजा आणि विद्वान होते !
श्रीलंकामध्ये प्राचीन लंकेच्या राजाबाबत लोकांमध्ये खुप उत्सुकता दिसून येत आहे. श्रीलंकेने काही दिवसांपूर्वीच रावण नावाचा उपग्रह पहिल्या अंतराळ मोहिमतून पाठवला आहे. श्रीलंकेत अनेक लोक मानतात की, रावण एक दयाळू राजा आणि विद्वान होते. काही भारतीय धर्मग्रंथ सुद्धा त्यांचे ‘महा ब्राह्मण‘ म्हणून वर्णन करतात, ज्याचा अर्थ आहे की एक महान ब्राह्मण किंवा महान विद्वान.