थरार ! 2 तास सुरू होतं मगरींमध्ये ‘घमासान’, एकमेकींना असं लोळवलं, ‘एवढया’ लाख लोकांनी पाहिला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे वेळ मिळत असल्यामुळे अनेकांकडून सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. दोन मगरींचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. दक्षिण कॅरोलिनामध्ये एकमेकींशी लढणार्‍या मगरी कॅमेर्‍यामध्ये कैद झाल्या आहेत. ही घटना हिल्टन हेड लेकजवळ असणार्‍या द गोल्फ क्लबमध्ये घडली आहे.मगरींची लढत सुमारे 2 तास चालली.

यावेळी मॅथ्यू प्रोफिट याठिकाणी मित्रांबरोबर गोल्फ खेळत होता. त्यावेळी प्रोफिटने हा व्हिडीओ शूट केला आहे. मगरी काही वेळासाठी अशाच पडून होत्या. त्यानंतर त्यांनी एकमेकांचा जबडा पकडला आणि त्यांनी एकमेकांना इकडे-तिकडे ढकलू लागल्या. त्या एकमेकांना आपापली शक्ती दाखवत असल्याचे दिसून आले. ही लढाई जवळपास 2 तास सुरू होती.’

मगरींचा हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 8 लाख युजर्सनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे 12 हजारपेक्षा अधिक जणांनी शेअर देखील केला आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहताना व्हिडीओचा आवाज वाढवायला विसरू नका. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी घाबरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी तर ’परत गोल्फ खेळणार नाही’ अशी देखील प्रतिक्रिया दिली आहे.