Social Media Trolling : साऊथ अ‍ॅक्ट्रेस विजयलक्ष्मीनं केला आत्महत्येचा प्रयत्न, हॉस्पिटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : साऊथ इंडियन अ‍ॅक्ट्रेस विजयलक्ष्मीने मानसिक तणावामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने तिला वाचवण्यात यश आले. विजयलक्ष्मीने तत्पूर्वी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले, त्यामध्ये म्हटले होते की, सोशल मीडियावर मला खुप छळले जात आहे, ज्यामुळे मी खुप तणावात आहे. तर रविवारी तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, मी काही ब्लड प्रेशरची औषध सेवन केली आहेत, ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होत चालले आहे, लवकरच मृत्यू होईल. सध्या विजयलक्ष्मीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

काही वेळातच होईल माझा मृत्यू…
तिने फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये म्हटले की, हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मागील चार महिन्यांपासून सीमान आणि तिच्या पार्टीच्या लोकांमुळे मी तणावात आहे. मी खुप प्रयत्न केला की, कुटुंबासाठी जीवंत राहावे, पण तसे होत नाही. मला हरी नादरने मीडियात खुप अपमानित केले. मी ब्लडप्रेशरच्या गोळ्या खाल्ल्या आहेत. काही वेळातच माझे ब्लड प्रेशर एकदम कमी होईल आणि माझा मृत्यू होईल.

विजयलक्ष्मीने हे सुद्धा म्हटले की, माझा मृत्यू लोकांसाठी एक उदाहरण झाले पाहिजे आणि त्यांनी आपल्या चाहत्यांना आवाहन केले की, सीमान आणि हरी नादर सारख्या लोकांना सोडू नका, माझे मानसिक शोषण करण्यासाठी या लोकांना कठोरातील कठोर शिक्षा केली जावी.

रिपोर्टनुसार, विजयलक्ष्मी चेन्नईच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती आहे, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. सीमान एक तमिळ नॅशनलिस्ट पार्टीची लीडर आहे, तर हरी नादर सुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. हरीने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये नांगुनेरी असेंबलीच्या बाय-इलेक्शनमध्ये भाग घेतला होता. परंतु, तो पराभूत झाला होता.