बाहुबलीनंतर आता ‘या’ चित्रपटाची विक्रमी कामगिरी

Advt.

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यातील डायलॉग आजही अनेकांच्या ओठावर आहेत. बाहुबलीने अनेक रेकॉर्ड करत विक्रमी कमाई केली. बाहुबलीनंतर आता आणखी एक नाव समोर आलं आहे ते म्हणजे ल्युसिफर या चित्रपटाचं. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची त्यात मुख्य भूमिका आहे. दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की, बाहुबलीचं नाव समोर येतं आता त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे.

प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाच्या कमाईचा आलेख उंचावताना दिसत आहे. या चित्रपटाने शंभर कोटींच कमाई केली आहे. सर्वाधिक वेगाने शंभर कोटींची कमाई करणारा ल्युसिफर हा पहिलाच मल्याळम चित्रपट ठरत आहे. साधारण आठवड्याभरापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आठच दिवसांत या चित्रपटाने विक्रमी कमाई करत मोठी कामगिरी केली आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेता मोहनलाल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये मोहनलाल म्हणतात की, “फक्त 8 दिवसांमध्येच ल्युसिफरने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे आणि हे खरंच अद्वितीय आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच आज मल्याळम चित्रपटसृष्टी काही नवी क्षितीजं पादाक्रांत करत आहे.” असे म्हणत मोहनलाल यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं म्हणजेच अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन आणि चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे.

मोहनलाल यांनी या चित्रपटातील आणखी सीनचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरू शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर लाथ उगारून आहेत. तर सदर पोलीस अधिकारी त्यांना घाबरलेला आहे आणि इतर कर्मचारी हे सर्व पाहत आहेत. लोकेशन पाहता हा सीन पोलीस ठाण्यातला असावा असा अंदाज येतो.

दरम्यान असामान्य कथानकं रुपेरी पडद्यावर उतरवणाऱ्या चित्रपटसृष्टींमध्ये मल्याळम कलाविश्वाचाही समावेश आहे आणि त्यातही मोहनलाल आणि इतरही काही कलाकारांचे मोलाचे योगदान आहे. इतकेच नाही तर, मल्याळम चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांची आणि त्यांच्या कामाची साऱ्या विश्वात बऱ्यापैकी चर्चा होत असते.