‘या’ करणामुळं एका रात्रीतून लाल रंगाची झाली ‘ही’ नदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आणि उत्तर कोरियातील सीमेवरील एका नदीचे पाणी एकदम लाल झाले आहे. पर्यावरणावर काम करणाऱ्या एका संस्थेने याबाबतचे फोटो देखील काढले आहेत. यानंतर स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. नदीमध्ये 47 हजार डुकरांचे रक्त वाहत असून यातील अनेक डुकरांचा आफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. यामुळे या पाण्यामुळे इतर प्राणी देखील आजारी पडू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. इमजीन (Imjin) असे या नदीचे नाव आहे.

गेल्या वर्षी जगातील अनेक देशामध्ये स्वाईन फ्लूचा प्रकोप पहायला मिळाला होता. कोरियाच्या भागात याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता. दक्षिण कोरिअरमध्ये 6,700 डुक्कर पालन केंद्रे आहेत ज्यामध्ये लाखो प्राणी पाळलेले आहेत. यामुळे येथील सरकारने सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे आणि सीमापार करणाऱ्या प्राण्यावर गोळीबार करण्याचे आदेश देखील प्रशासनाने दिलेले आहेत.

यानंतर देखील दक्षिण कोरियामध्ये सप्टेंबर महिन्यात स्वाईन फ्लूचा हल्ला मोठ्या प्रमाणावर झाला होता. यामुळे मनुष्याला कोणतीही हानी होत नाही परंतु रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने डुक्कर मोठ्या प्रमाणावर आजारी पडतात अशा वेळेस त्यांचे मांस खाणे योग्य नाही. यामुळे कोरियन सरकारने पालन करणाऱ्यांना डुकरांना मारून टाकण्याचे आदेश दिले होते.

यानंतर अनेकांनी याचा धोका लक्षात घेऊन हजारो डुकरांच्या कत्तली केल्या. हे मृतदेह दफन करण्यासाठी लागणारे प्लास्टिक कंटेनर उपलब्ध होऊ न शकल्याने डंपिंग यार्डमध्येच सर्व मृतदेह पडून होते अशातच पाऊस झाल्याने सर्व रक्त नदीच्या पाण्यात येऊन मिळाले.

त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या नदीचे फोटो आणि व्हिडीओ काढले त्यानंतर ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले होते. कोरियन सर्व वृत्तवाहिन्यांनी देखील याबाबतच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर दाखवल्या होत्या. मात्र सर्व प्राण्यांना मारण्याआधी त्याच्यावर उपचार करण्यात आले होते त्यामुळे पाण्यावर याचा परिणाम होणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र सर्व सामान्य लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. कोरियातील सातव्या क्रमांकाची ही सर्वात मोठी नदी आहे यामुळे यावर मोठे लोकजीवन देखील अवलंबून आहे.

आतापर्यंत ऐकून तीन लाख ऐशी हजार डुकरांना मारण्यात आले आहे. एवढेच नाही तर शेजारील चीन, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशांमध्येही याचा प्रादुर्भाव पसरला आहे. चीनने देखील त्याच्या येथील अनेक डुकरांना यासाठी मारले आहे. चीनमध्ये डुकराचे मांस खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे त्यांना नवीन जातीच्या डुकरांचे संक्रमण करावे लागले आणि यातून निर्माण झालेल्या प्रजातींची सध्या बाजारात किंमत खूप जास्त आहे.

Visit : Policenama.com