साऊथचा सुपरस्टार पृथ्वीराज 58 क्रू मेंबर्ससहित ‘कोरोना’मुळं परदेशताच अडकला, देशात परत येण्यासाठी मदतीची ‘हाक’

पोलीसनामा ऑनलाईन :मल्याळम सिनेमातील सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या आगामी सिनेमाच्या शुटींगसाठी जॉर्डनला गेला होता. परंतु कोरोनामुळं पृथ्वीराजसहित सिनेमातील 58 क्रू मेंबर्स जॉर्डनमध्येच अकडले आहेत. शुक्रवारी नॉन रेसिडेंट केरलाईट्स अफेअर्स विभागानं जॉर्डनमध्ये भारतीय अॅम्बेसीला कॉन्टॅक्ट करून या सगळ्याबद्दल चौकशी केली. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी NORKAच्या मुख्य सचिवांसोबतही लोकांच्या माहितीसाठी संपर्क केला आहे.

सध्य कोरोना व्हायरस जगभरात हाहाकार माजवताना दिसत आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी आता भारतात 21 लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतासहित अनेक देशात लॉकडाऊन आहे. अशात आता अभिनेता पृथ्वीराज आपल्या क्रू मेंबर्ससोबत जॉर्डनमध्येच अडकला आहे. फिल्म क्रिटीक रमेश बालानं ट्विट करत याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. केरळ फिल्म चेंबर्स ऑफ कॉर्मसनं केरळचे सीएम आणि एमईए यांना सर्व घटनाक्रम सांगितला आहे असं त्यानं ट्विटमध्ये लिहिलं आहे.

अनेकांना माहितीच असेल पृथ्वीराज बॉलिवूड स्टार राणी मुखर्जीसोबत अय्या या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसला आहे. कोरोनाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 12 तासात कोरोनाची नवीन 240 प्रकरणं समोर आली आहेत. देशातील बाधितांचा आकडाही 1400 हून अधिक झाला आहे. 133 लोक आतापर्यंत ठिक झाले आहेत. अद्याप 38 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like