यामुळे ‘क्वीन ऑफ डार्क’ होतेय सोशलवर व्हायरल

वृत्तसंस्था – भारतात अजूनही फेअर अँड लवली विकली जात आहे. फेअर म्हणजेच ब्युटी आणि ब्युटी म्हणजेच फेअर असाच लोकांचा समज आहे. अनेक जण आपल्याला निसर्गत: मिळालेल्या अनके गोष्टींचा तिरस्कार करतात. अनेक गोष्टींमुळे ते नाखुश असतात आणि त्यांना आपण नेहमी त्याबद्दल तक्रार करतानाही पाहत असतो. काहींना उंचीबद्दल तक्रार असते. काहींना आपल्या लुकबाबत तक्रार असते तर काहींना आपला रंग आवडत नसतो. गोरा रंग सर्वांनाच आवडतो आणि गोरे बनण्यासाठी ते अनेक प्रकारच्या धडपडी करतानाही आपण पाहतो. टीव्हीवरही रंग गोरा करण्यासाठी अनेक उत्पादनांची जाहिरात केली जाते. सामान्य जनताही अनेक उत्पादने वापरतात. सौंदर्य म्हटलं पहिलं डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गोरा रंग. काहींना तर आपल्या काळ्या रंगाबद्दल घृणाही वाटते परंतु देवाने किंवा निसर्गाने आपल्याला जे काही दिले आहे त्यात समाधानी राहत त्याचे स्वागत आपण करायला हवे असे एका माॅडेलने सिद्ध केले आहे. कारण तिच्या रंगाचा तिला अभिमान असून ती आहे त्यात खूप आनंदी आहे.

अनेकांना गोरे होण्याची क्रेज असते. पण सुदानमध्ये या मॉडेलचा रंग एकदम काळा आहे, पण तिला या रंगाचा गर्व आहे. सध्या गोरे बनण्यासाठी विविध क्रिम बाजारात आहेत. सध्या इंटरनेटवर दक्षिण सुदानची एक मॉडेल न्याकिम गॅटवेच धुमाकूळ घालत असून सोशल मीडियावर या मॉडेलचे फोटो व्हायरल होत आहेत. तिला क्वीन ऑफ डार्क म्हणून ओळखले जात आहे.

सुदानच्या या मॉडेलला सोशल मीडियावर क्वीन ऑफ डार्क अशी पदवी दिली आहे. तिने या पदवीबद्दल सर्वांचे आभार मानले आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात ती म्हणाली, “जगात प्रत्येक माणूस सुंदर असतो, आपला जो स्कीनचा कलर आहे, तो देवाने दिला आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल वाईट का वाटून घ्यावे.” तिची हे पाेस्ट नक्कीच प्रेरणा देणारी आहे. त्यावरून खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्याला मिळालेल्या गोष्टींवर नाखुश असणाऱ्याला सुदानचे उदाहरण देणे रास्त आहे.