यंदा केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची वाट पहावी लागणार, ‘या’ कारणामुळं होणार 4 दिवस ‘उशीर’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी मात्र विलंबाने दाखल होणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सूनची यावर्षीची केरळमधील दाखल होण्याची तारीख जाहीर केली असून, त्या तारेखेनुसार मान्सून केरळमध्ये 5 जून रोजी दाखल होईल.

देशातील चार महिन्यांच्या मान्सून हंगाम 1 जूनपासून सुरु होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर तो पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो. 1901 ते 1940 दरम्यान देशातील 149 ठिकाणाहून गोळा करण्यात आलल्या आकडेवारनुसार देशात मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. गेल्या काही वर्षापासून मान्सूनचे आगमन, त्याचा वर्षाव, परतीचा प्रवास यात बदल होत आहे. हे बदल होत असल्याने मान्सूनच्या आगमानाच्या आणि परतीच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत होती.

या राज्यात उशिराने येणार मान्सून

परिणामी हवामान खात्याने 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षाच्या मान्सूनचा अभ्यास केला. तर 1971 ते 2019 दरम्यानच्या 48 वर्षाच्या काळातील मान्सूनचे आगमन, परतीचा प्रवास या आधारावर त्याचे आगमन, परतीचा प्रवास यात काही बदल केले. मान्सूनच्या आगमनाची तारीख 1 जूनच आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही. केरळनंतर पुढे म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्या मान्सून दाखल होण्यास विलंब होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमामे मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. परतीच्या पावसाची तारीख 15 ऑक्टोबरच ठेवण्यात आली आहे. म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी मान्सून संपुर्ण देशातून माघार घेईल.

अंदमान निकोबारमध्ये कधी येणार मान्सून ?

यापूर्वी हवामान खात्याने सांगितले होते की, शनिवारी नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि बंगालच्या उपसागरापर्य़ंत पोहचण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार नैऋत्य मान्सून अनेकदा अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि बंगालच्या उपसागरात 20 मे पर्य़ंत पोहोचतो आणि त्यानंतर केरळमध्ये 10 ते 11 दिवसांत पोहचतो.