दिवाळीला यांना मिळणार सोन्यावर दुप्पट फायदा ! जाणून घ्या कशी होईल मोठी कमाई
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात त्या लोकांकडे सोन्यातून दुप्पट पैसे करण्याची संधी आहे, ज्यांनी सॉवरेन गोल्ड बॉन्ड्समध्ये सर्वप्रथम गुंतवणूक केली होती. कारण, नोव्हेंबर 2015 मध्ये लाँच झालेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या प्रीमॅच्युअर रिडेम्प्शनचा कालावधी नोव्हेंबर 2020 मध्ये पूर्ण होईल. त्यादरम्यान गोल्ड बाँडचा भाव 2,683 रुपये प्रति ग्रॅम होता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सध्या सोन्याचा भाव 5,135 रुपये प्रति ग्रॅम आहे. यामुळे अगोदर गोल्ड बाँडची 5 वर्ष पूर्ण होतील, अशावेळी फिजिकल फॉर्म किंवा ऑनलाइन गोल्ड बाँड खरेदी करणारे गुंतवणुकदार यास रीडीम करू शकतात.
मागील 5 वर्षात किती झाला फायदा ?
गोल्ड रीडीम केल्यावर सोन्याचा भाव आयबीजेएद्वारे करण्यात आलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या आधारावर असेल. सध्याच्या किंमतीबाबत बोलायचे तर ज्यांनी यामध्ये सर्वप्रथम गुंतवणूक केली होती, त्यांना सुमारे 90 टक्केचा फायदा मिळेल. सोबतच, मागील 5 वर्षात त्यांना प्रत्येक वर्षी सुमारे 14 टक्केचा लाभ झाला आहे.
केवळ व्याजातून 13 हजारपेक्षा जास्त कमाई
केवळ एवढेच नाही, भांडवली लाभाशिवाय सुद्धा गुंतवणुकदारांना वार्षिक 2.75 टक्केच्या दराने व्याज सुद्धा मिळेल. जर या 5 वर्षासाठी 1 लाख रुपये सोन्याची गुंतवणुक केली गेली असेल, तर 2.75 टक्केच्या हिशेबाने एकुण वार्षिक व्याज 13,750 रुपयांवर पोहचले आहे.
कारण, हे बाँड स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत. अशावेळी गुंतवणुकदरांकडे ते कधीही खरेदी करण्याची आणि विकण्याची संधी आहे. एक्सचेंजवर या बाँडला विकण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे अनिवार्य आहे.
पुढील वर्षी 68,000 रुपयांपर्यंत पोहचू शकतो भाव
बुलियन मार्केटच्या जाणकारांचे म्हणणे आहे की, मागील वर्षी जुलैमध्ये सोन्यात असलेली तेजी पुढेही जारी राहील. मागच्या दोन वर्षात सोन्यात सुमारे 60 टक्केची तेजी दिसून आली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये सोन्यात सुमारे 25 टक्केची आणखी तेजी येईल. जर असे झाले तर पुढील वर्षी स्थानिक बाजारात सोन्याचा भाव 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतो.