Gold News | खुशखबर ! 12 जुलैपासून मिळणार स्वस्त सोने, सरकार देईल स्वस्तात खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कोणत्या दराने मिळणार?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gold News | जर तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी (Gold Price) करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक (Gold investment) करायची असेल तर सोमवारपासून सुवर्णसंधी आहे. 12 जुलैपासून सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरीज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) ची विक्री सुरू होत आहे. ही विक्री 16 जुलैपासून चालेल. रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे जारी निवेदनानुसार, या सीरीजमध्ये प्रति ग्रॅम गोल्डची किंमत 4,807 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. Sovereign Gold Bond आरबीआय सरकारकडून जारी करते. अशावेळी जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर याबाबत डिटेल्स जाणून घेवूयात…

ऑनलाइन खरेदी केल्यास मिळेल सूट
सॉवरेन गोल्ड बाँड 2021-22 चा चौथा हप्ता सोमवारपासून पाच दिवसासाठी सबस्क्रीपशनसाठी खुला राहील. बाँडसाठी ऑनलाइन अर्ज केला तर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. म्हणजे एक ग्रॅम गोल्ड बाँडची किंमत 4,757 रुपये असेल.

कुठे खरेदी करू शकता बाँड ?
हे बाँड सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज (Stock Exchanges), NSE आणि BSE च्या माध्यमातून विकले जातील. स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांमध्ये याची विक्री होत नाही. एका आर्थिक वर्षात एक व्यक्ती कमाल 4 किग्रॅ सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. किमान गुंतवणूक एक ग्रॅम आहे.

सॉवरेन गोल्ड बाँडचे फायदे
– मॅच्युरिटीवर सॉवरेन बाँड टॅक्स फ्री होतात.
– केंद्र सरकारची स्कीम असल्याने जोखीम नाही.
– फिजिकल गोल्ड ऐवजी बाँड मॅनेज करणे सोपे असते.
– शुद्धतेबाबत शंका रहात नाही. 24 कॅरेट गोल्ड असते.
– एग्झिटचा सोपा पर्याय आहे. गोल्डवर लोन सुविधा मिळते.
– मॅच्युरिटी पीरियड 8 वर्षाचा असतो, 5 वर्षानंतर विकण्याचा पर्याय आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : sovereign gold bond scheme opens for subscription on 12 july 2021 check price other details varpat

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान

Kappa variant | डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवीन कप्पा व्हेरिएंट, जाणून घ्या याची लक्षणे आणि कसे पडले याचे नाव