Sovereign Gold Bond | पुढील 5 दिवसांपर्यंत ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sovereign Gold Bond | तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करायचे असेल तर सरकारी स्कीम आज सोमवार 25 ऑक्टोबरपासून खुली झाली आहे. या Sovereign Gold Bond Scheme द्वारे सरकार स्वस्त सोने विकते. सॉव्हरेन गोल्ड बाँड्स स्कीम 5 दिवसापर्यंत खुली राहणार आहे आणि 30 ऑक्टोबरला बंद होणार आहे.

सणाच्या काळात सोन्याची खरेदी वाढते अशावेळी भारत सरकार स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. हे गोल्ड बाँड 8 वर्षात मॅच्युअर होतील. फिजिकल गोल्ड खरेदी न करता तुम्ही रिटर्नचा लाभ घेऊ शकता.

 

सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेची वैशिष्ट्ये –

या योजनेत सोन्याचा दर 4765 रुपये प्रति ग्रॅम आहे.

ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक ग्रॅम गोल्डवर 50 रुपये सूट मिळेल.

सॉव्हरेन गोल्ड बाँडची (Sovereign Gold Bond) विक्री बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंजद्वारे करता येईल.

हे बाँड केंद्र सरकारकडून आरबीआय जारी करेल.

बाँड मॅच्युअर होण्याचा कालावधी 8 वर्षांचा आहे. मात्र 5 वर्षानंतर पैसे काढण्याचा पर्याय असेल.

गुंतवणुकदार हे बाँड सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेड करू शकतात.

दरवर्षी 2.50% चे गॅरेंटेड रिटर्न मिळेल.

किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल.

कमाल 4 किलो सोने खरेदी करता येऊ शकते. HUF सुद्धा 4 किलो सोने खरेदी करू शकतात. एका फिस्कल ईयरमध्ये ट्रस्त आणि अशाप्रकारच्या संघटना कमाल 20 किलो सोने खरेदी करू शकतात.

यासाठी KYC नॉर्म फिजिकल सोने खरेदीच्या समान असतील. गुंतवणूक मॅच्युरिटीपर्यंत राहिल्यास कोणताही कॅपिटल गेन टॅक्स नाही. जर मॅच्युरिटीपूर्वी बाँड विकले तर कॅपिटल गेन टॅक्स भरवा लागेल. प्रत्येक वर्षी मिळणार्‍या रिटर्नवर इन्कम टॅक्स द्यावा लागेल.

 

Web Title :- Sovereign Gold Bond | sovereign gold bond scheme opened chance to buy cheap gold for next 5 days know rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MSRTC | ऐन दिवाळीत एसटीच्या तिकीट दरात तब्बल 17 टक्क्यांची वाढ !

Pune Navale Bridge | नवले पूलाची समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिका उचलणार ‘हे’ पाऊल, महापौरांनी दिले आदेश

Pune Crime | गुंड संतोष जगतापच्या हत्येनंतर झळकला श्रद्धांजलीचा ‘फ्लेक्स’, पोलिसांनी केलं ‘हे’ काम

Aryan Khan Drugs Case | ‘मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, आर्यननेच फोन करण्याची विनंती केली होती’; माझ्या जीवाला धोका’, किरण गोसावीचा खुलासा

Pune Corporation GB | नाना पेठेतील ‘दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ संस्थेस 30 वर्षे भाडेकरार वाढीस मुदतवाढ; सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय (Live Video)