२१ मुलींचा लैंगिक छळ ; मुख्यध्यापकाचे तडकाफडकी निलंबन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन  – जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यध्यापकाने २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. हि घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात घडली आहे. गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणातील पीडित मुलींचा जबाब नोंदवून घेत संबधित मुख्यध्यापकांवर निलंबनाची कार्यवाही केली आहे.

सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेच्या मुख्यध्यापका विरोधात २१ विद्यार्थिंनी आपले लैंगिक शोषण केले आहे. असा जबाब नोंदवला आहे. गेल्या आठवड्या पासून या शाळेतील मुख्याध्यापक अश्लील भाषेचा वापर करून बोलत होता. असे त्या पीडित मुलींनी आपल्या दिलेल्या जबाबात म्हणले आहे. या सर्व मुली या पाचवी ते सातवी या वर्गात शिकणाऱ्या विद्यर्थिनी आहेत.

या २१ मुलींपैकी काही मुलींनी हा प्रकार घरी सांगितला असता त्या मुलींच्या आई वडिलांनी शाळेत येऊन याबाबत मुख्याध्यापकाला जाब विचारला. पालकांनी शाळेत येऊन घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे गटशिक्षण अधिकारी विजय दुतोंडे हे शाळेत पोचले. त्यानंतर त्यांनी त्या २१ विद्यार्थिनींचा जबाब नोंदवून घेतला आणि मुख्यध्यापकाचे तातडीने निलंबन केले. या सर्व प्रकरणाची गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू वाघ यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना मुख्यध्यापक फरार झाला आहे.