‘सपा’चे अबु आझमी विजयी, शिवसेनेच्या विठ्ठल लोकरेंचा दारुण पराभव

शिवाजीनगर मानखुर्द : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांची अटीतटीची लढत मानली जात होती. परंतू अबू आझमी यांनी मताधिक्याने विजय मिळवला. अबू आझमी यांनी 25,601 मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघातून अबू आझमी हे 25 हजार मतांनी आघाडीवर होते. विठ्ठल लोकरे यांच्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रचार केला होता.

या निवडणूकीत दुपारी 3.45 मिनिटांनी अबु आझमी यांना 69,036 मते मिळवली तर 43,423 मते विठ्ठल लोकरे यांना मिळाली होती. या मतदारसंघात 47.21 टक्के मतदान झाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सपाच्या अबू आझमी यांनी 41 हजार 719 एवढी मते घेत विजय मिळवला. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे सुरेश पाटील होते. त्यांना 31 हजार 782 मते मिळाली आणि त्यांचा 9 हजार 937 मतांनी पराभव झाला. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर काँग्रेस चे युसुफ अब्राहनी, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे आणि पाचव्या क्रमांकावर एमआयएम चे अल्ताफ काझी होते.

1. अबु आसिम आजमी (समाजवादी पार्टी) – 69082 मते (विजयी उमेदवार)
2. विठ्ठल गोविंद लोकरे (शिवसेना) – 43481 मते
3. मारुती (दादा) धर्मा गायकवाड (बहुजन समाज पार्टी) – 2733 मते
4. आलमगीर अहमद आर रहमानी (पीस पार्टी) – 800 मते
5. राकेश चंद्रकांत गायकवाड (बहुजन मुक्ति पार्टी) – 531 मते
6. सुरैया अकबर शेख (वंचित बहुजन अघाडी) – 10465 मते
7. खुरशेद नजीर खान (अपक्ष) 949 मते
8. खोत रविंद्र कृष्णा (अपक्ष) – 3288 मते
9. बबन सोपान ठोके (अपक्ष) 397 मते
10. मोहम्मद सिराज मोहम्मद इकबाल शेख (अपक्ष) 9789 मते
11. NOTA – 1876 मते

Visit : Policenama.com