सपा आणि बसपाला काँग्रेसला द्यायच्या आहेत फक्त २ जागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयी रथ रोखण्यासाठी देशात सध्या काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचे मिळून महाआघाडी उदयाला आहे. लोकसभेची निवडणूक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता असल्याने महाआघाडीच्या जागा वाटपावर सध्या चांगले घमासान रंगताना दिसते आहे. सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांना आता काँग्रेसला उत्तर प्रदेश मध्ये मॅनेज करून फक्त दोन जागी थांबवायचे आहे. त्यादृष्टीने त्यांनी रणनीती आखण्यासाठी सुरुवात केली आहे.

गत निवडणुकीतील समाजवादी पार्टीची स्थिती (लोकसभा निवडणूक २०१४)

२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत समाजवादी पार्टीची पुरती धूळधाण झाली पक्षाच्या जागा घटण्याची संख्या एवढी होती कि समाजवादी पक्षाच्या यादव परिवाराव्यतिरिक्त अन्य एक हि उमेदवार जिंकू शकला नाही. परंतु विशेष बाब म्हणजे मोदी लाटेत हि मुलायम सिंह दोन जागेवरून निवडून आले होते. अखिलेश यादव यांच्या पत्नी डिप्पल यादव या हि या निवडणुकीत जिंकून आल्या होत्या. तर आजमगढ़,कन्नौज, बदायूं,फिरोजाबाद ,मैनपुरी अशा एकूण पाच जागी समाजवादी पार्टी जिंकली आहे. तर या निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी सपाने बसपा आणि काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाची स्थिती

२००९ च्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडून आलेल्या जागांच्या बळावर बहुजन समाज पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला तर या पक्षाची त्यानंतर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत स्थिती एवढी खराब होती कि या पक्षाला लोकसभे मध्ये आपले खाते हि उघडता आले नाही.  उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष गत लोकसभा निवडणुकीत  शून्यावर थांबला तर येत्या निवडणुकीत या पक्षाला चांगली कामगिरी करायची असल्याने पक्ष निवडणुकीच्या तयारीत आघाडी करत आहे.

काँग्रेसला द्यायच्या आहेत या दोन जागा

काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी गेल्या २५ वर्षात या पक्षाला उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे म्हणून येत्या निवडणुकीत काँग्रेसने मतांचे विभाजन टाळण्यासाठी सपा आणि बसपा या पक्षांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर सपा आणि बसपा या दोन पक्षांनी काँग्रेसलाच कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. राहुल गांधी खासदार असलेले अमेठी आणि सोनिया गांधी खासदार असलेल्या  रायबरेली या दोनच जागा काँग्रेसला देण्याचा घाट सपा आणि बसपाने घातला आहे.

असे होऊ शकते

काँग्रेस सपा आणि बसपा हि आघाडी तुटणे अशक्य आहे. तर काँग्रेस उत्तर प्रदेशातील त्यांचे संघटन मजबूत असणाऱ्या आणि गत निवडणुकीत थोडक्यात हरलेल्या जागा अशा एकूण  १० जागा काँग्रेस मागू शकते. म्हणजे काँग्रेस उत्तर प्रदेशात काँग्रेस कमीपणाची बाजू घेऊ शकतो.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवट आहेत. येत्या निवडणुकीत भाजप आपली सत्ता राखू शकणार का या प्रश्नाचे उत्तर देणे  दिवसेंदिवस  कठीण होत चालले आहे म्हणून आगामी काळात घडणाऱ्या  राजकीय स्थित्यंतरांवरच लोकसभेच्या निवडणुकीचे अंदाज बांधता येऊ शकतात.