सुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या वर्षी निधन, मुलगा चरणनं सांगितलं

वृत्तसंस्था – प्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नई येथे उपचार चालू होते. काही दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांची कोरोना व्हायरसची चाचणी देखील निगेटिव्ह आल्याचं त्यांच्या मुलानं सांगितलं होतं. मात्र, आज एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा एस.पी. चरण यांनी दिली आहे.

प्रकृती खालावल्यामुळं त्यांना रूग्णालयात दाखल केलं होतं. 74 वर्षाचे बालसुब्रमण्यम हे बरे व्हावेत म्हणून त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना देखील केली होती. सोशल मीडियावर त्याबाबत अनेक पोस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचाही समावेश होता.