पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी

शिक्रापुर – पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच शिरुर व हवेली तालुक्यातील काही ऐतिहासीक स्थळांना भेट देत तेथील माहिती घेत सुरक्षितेचा आढावा घेतला. यावेळी डॉ. अभिनव देशमुख यांनी तुळापुर,कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक तसेच पेरणे फाटा परिसराला परिसलाला भेटी दिल्या.

प्रथम पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिकविजयस्तंभाला भेट देत तेथील पाहणी केली. त्यानंतर तुळापूर येथील छत्रपती संभाजी राजांच्या बलिदान स्थळाची पाहणी केली यावेळी लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याकडून तेथील माहिती जाणून घेतली.त्यानंतर डाॕ देशमुख यांनी कोरेगाव-भीमाला भेट देत १ जानेवारी २०१८साली झालेल्या दंगलीची शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार व सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्याकडून माहिती जाणून घेत पाहणी केली. त्यानंतर वढू बुद्रुक येथेही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळास व गोविंद गोपाळ समाधी स्थळास भेट दिली. तेथील सुरक्षा यंत्रनेची पाहणी करत परिसराचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना डाॕ अभिनव देशमुख यांनी सांगितले की राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असतानाच येत्या काळात नवरात्री व त्यानंतर येणाऱ्या विविध सणांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.तर एक जानेवारी २०२१ रोजीच्या कोरेगाव भीमा येथील ऐतिहासीक विजय रणस्तंभावरील मानवंदना कार्यक्रमाचा निर्णयही त्यावेळची सर्व परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय शासन स्तरावरच होईल.

यावेळी त्यांच्या समवेत लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप मानकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस नाईक विलास आंबेकर, अशोक केदार, संजय ढमाल, बाळासाहेब गाडेकर यांसह आदी उपस्थित होते.